शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘साहब खाने को वडापाव भी चलेगा’...

By admin | Updated: July 2, 2016 05:18 IST

गँगस्टर कुमार पिल्लेने पोलिसांसमोर नरमाईची भूमिका घेत दोन गुन्ह्यांत कबुली दिली आहे.

मनीषा म्हात्रे,

मुंबई- गँगस्टर कुमार पिल्लेने पोलिसांसमोर नरमाईची भूमिका घेत दोन गुन्ह्यांत कबुली दिली आहे. मात्र अन्य गुन्ह्यांत ‘तो मी नव्हेच’ भूमिका घेत हात वर केल्याने पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहेत. एकेकाळी पूर्व उपनगरात दहशत निर्माण केलेल्या गँगस्टरने पोलिसांसमोर पडती बाजू घेतली आहे. अशावेळी ‘साहेब.. खायला वडापाव दिला तरी चालेल, फक्त पोटापाण्याचे बघा,’ असे तो तपास अधिकाऱ्यांना सांगत आहे. सिंगापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर गुन्हे शाखा ७चे अधिकारी पिल्लेकडे अधिक तपास करीत आहेत. हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न असे एकूण ९ गुन्हे कुमार पिल्लेविरोधात दाखल आहेत. यापैकी २००९मध्ये त्याने खंडणीसाठी विकासकावर हल्ला केला होता, त्यानंतर लोढा विकासकाच्या कार्यालयात गोळीबार केला होता. या दोन गुन्ह्यांसह २०१३मध्ये मनसे आमदार मंगेश सांगळे यांना खंडणीसाठी धमकाविणे अशा तीन गुन्ह्यांचा सखोल तपास गुन्हे शाखेने सुरू केला आहे.यापैकी दोन गुन्ह्यांची कबुली कुमार पिल्लेने पोलिसांना दिली. त्यात विक्रोळीतील शहा विकासकावर झालेल्या गोळीबाराचाही समावेश असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली. पिल्लेने २००९ साली विक्रोळी येथील रमेश शहा विकासकाला फोन करून ५० लाखांच्या खंडणीसाठी धमकाविले होते. त्यानंतर त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला होता. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली होती. तर यातील तिघांना मोक्का न्यायालयाने दोषी ठरविले होते. मात्र पोलिसांपुढे नरमाईची भूमिका घेतलेल्या पिल्लेने इतर गुन्ह्यांत हात वर केले आहेत. अन्य गुन्ह्यांत आपला काहीही संबंध नसून आपल्या नावाने पैसे उकळण्यात येत होते. याबाबत मी माझ्या टोळीतील मुलांना तक्रार देण्यासही सांगितले होते, अशी माहिती पिल्लेने पोलिसांना दिली. मात्र गुन्ह्यांतून पळ काढण्यासाठी पिल्ले मार्ग काढत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार गुन्हे शाखा त्याच्याकडे कसून चौकशी करीत आहे.>दाऊदचा गेम करण्याचा होता कटपिल्लेने अमर नाईकसह मिळून दाऊदचा गेम करण्याचा कट आखल्याची माहिती समोर आली. ४ शुटर पिल्लेने आखलेल्या कटानुसार दुबईत पोहचले होते. दाऊद शारजा स्टेडीयमवर जाणार असल्याची माहिती शुटर्सकडे आली होती. त्याला मारायचे कुठे यावरुन या चौघांमध्येच वाद सुरु झाला. यातून दाऊद त्यांच्या हातातून निसटला.