शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चिमुकल्याच्या ताब्याचा पेच कायम

By admin | Updated: January 18, 2016 03:48 IST

नेपाळमध्ये पतीच्या ताब्यात असलेल्या आपल्या मुलाचा ताबा मिळावा, म्हणून एका महिलेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली

नागपूर : नेपाळमध्ये पतीच्या ताब्यात असलेल्या आपल्या मुलाचा ताबा मिळावा, म्हणून एका महिलेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ८ डिसेंबर रोजी न्यायालयाने या चिमुकल्याला ११ जानेवारीपर्यंत हजर करण्याचे निर्देश दिले होते, परंतु तो नेपाळमध्ये असल्यामुळे पोलिसांना आदेशाचे पालन करता आले नसल्याने त्याच्या ताब्याचा पेच अद्यापही कायम आहे.न्यायालयाने आता ८ डिसेंबरचा आदेश नेपाळ दूतावासाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच मुलाच्या आईलाही तिच्या परीने प्रयत्न करण्याची मुभा दिली आहे. नेपाळच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय हा प्रश्न लवकर सुटणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याचिकेवरील पुढील सुनावणी १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. दीपाली ठाकूर असे याचिकाकर्तीचे नाव असून, ती अमरावती येथील रहिवासी आहेत. तिने नेपाळचा मूळ रहिवासी बहादूरसिंग ठाकूरशी २५ मे २००९ रोजी लग्न केले. त्यांना वंश नामक मुलगा आहे. लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये वाद सुरू झाले. दीपाली आजारी वडिलांना पहायला अमरावती येथे आली असता, बहादूरसिंग मुलाला घेऊन नेपाळला निघून गेला. मुलाचा ताबा आईला देण्यासंदर्भात सीबीआयने न्यायालयाच्या निर्देशानुसार नेपाळ दूतावासाशी पत्रव्यवहार केला आहे. (प्रतिनिधी)