शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकास, महसूलमध्ये जुंपली

By admin | Updated: January 17, 2016 02:27 IST

पंचायत समित्यांच्या कामकाजाचा महसूल अधिकाऱ्यांकरवी आढावा घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीचे तीव्र पडसाद महाराष्ट्र विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांमध्ये उमटले असून, महसूल यंत्रणेच्या

नाशिक : पंचायत समित्यांच्या कामकाजाचा महसूल अधिकाऱ्यांकरवी आढावा घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीचे तीव्र पडसाद महाराष्ट्र विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांमध्ये उमटले असून, महसूल यंत्रणेच्या वाढत्या हस्तक्षेपाबद्दल थेट ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे तक्रार करण्याची तयारी अधिकाऱ्यांच्या संघटनेने केली आहे. सोशल मीडियावरून दिवसभर त्या संदर्भात संदेशाची देवाणघेवाण होऊन महसूल विभागाचा निषेध करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या कामकाजाचा दर महिन्याला उपजिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी घेतला असून, त्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक व कामकाजाची रूपरेषा ठरवून देण्यात आली आहे. त्यातील काही तालुक्यांमध्ये महसूल अधिकाऱ्यांनी बैठकांचे आयोजनही केले असताना ही बाब ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या पचनी पडलेली नाही. यासंदर्भात शनिवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच त्याचे तीव्र पडसाद उमटले. महसूल यंत्रणेला ग्रामीण विकासचा ध्यास असेल तर महसूल व ग्रामीण विकास ही दोन्ही खाती एकमेकांमध्ये वर्ग करून प्रत्येकाला आवडीनिवडीनुसार सेवा करण्याची संधी द्यावी, अशा प्रतिक्रिया देतानाच, महसूल विभागाला गौणखनिजाचा मलिदा सोडता येत नाही, अशी खरमरीत टीकाही त्यावर करण्यात आली आहे.कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ?ब्रिटिशांनी घालून दिलेल्या पद्धतीनुसार आजही महसूल खाते स्वत:ला सर्वात श्रेष्ठ व इतर खात्यांना कनिष्ठ समजत असेल तर ही पद्धत मोडीत काढावी, असे आवाहन करून ग्रामीण विकासच्या अधिकाऱ्यांनी अन्यायाच्या विरोधात एकवटावे, अशी विनंतीही केली आहे. महसूल खात्याविरुद्ध एकजूट दाखवून यासंदर्भात पंकजा मुंडे तसेच मुख्य सचिवांकडे लेखी तक्रार करण्याची तयारीही सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.