शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे बुजविण्यासाठी धावपळ

By admin | Updated: July 23, 2016 02:56 IST

‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रम शनिवारी नेरूळमधील ज्वेल आॅफ नवी मुंबई येथे होणार आहे.

नवी मुंबई : ‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रम शनिवारी नेरूळमधील ज्वेल आॅफ नवी मुंबई येथे होणार आहे. यामुळे पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर या परिसरातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. गटारावरील झाकणेही बसविली असून दिवसभर विशेष साफसफाई मोहीम राबविण्यात आली. नवी मुंबईमधील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांसह शहराच्या विकासाविषयी संकल्पना समजून घेण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत सीबीडी, वाशी, सानपाडा, कोपरखैरणे, रबाळेमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. नेरूळमध्ये पामबीच रोडला लागून असलेल्या ज्वेल आॅफ नवी मुंबई या वॉटर बॉडीच्या बाजूला विकसित केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर आयुक्त नागरिकांशी संवाद साधणार आहेत. शुक्रवारी दिवसभर नेरूळ ते सानपाडा रोडवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. तलावाच्या चारही बाजूच्या रस्त्यांवर कुठेही कचरा आढळणार नाही याची काळजी घेण्यात येत होती. नेरूळ व सानपाडा दरम्यानच्या रोडजवळील पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या गटारावरील झाकणे मागील काही वर्षांपासून गायब झाली आहेत. यामुळे नाईलाजाने नागरिकांना रोडवरून चालावे लागते. प्रशासनाने युद्धपातळीवर सर्व झाकणे बसविली आहेत. तलावाच्या काठावर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी शेड उभारण्यात आले आहे.>प्रत्येक विभागात आयुक्तांनी यावे ‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रमामुळे तलाव परिसर स्वच्छ झाला आहे. रोडवरील खड्डे गायब झाले असून गटारावरील झाकणे बसविल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आयुक्तांनी सर्व विभागांना भेट दिली तर पूर्ण शहर स्वच्छ व खड्डेमुक्त होईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.