शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धावती गाडी पकडणे जिवावर बेतले

By admin | Updated: June 26, 2017 02:47 IST

धावत्या ज्ञानेश्वरी समरसता एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाचा पाय घसरून ठाणे स्टेशनवरील प्लॉटफार्मच्या गॅपमध्ये दूरवर फरफटत गेला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : धावत्या ज्ञानेश्वरी समरसता एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाचा पाय घसरून ठाणे स्टेशनवरील प्लॉटफार्मच्या गॅपमध्ये दूरवर फरफटत गेला. प्रवाशांनी आरडाओरड करीत गाडी थांबवून त्यास बाहेर काढले. सदर प्रवाशास सिव्हील रुग्णालयात त्यास दाखल केले असता उपचारादरम्यान शनिवारच्या मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला.मुंबईहून हावडा जाण्यासाठी निघालेली ज्ञानेश्वरी समरसता एक्स्प्रेस सिग्नल नसल्यामुळे येथील प्लॉटफार्म क्र. ७ वर शनिवारी रात्री थांबली होती. काही प्रवासी उतरून प्लॉटफार्मवर फिरत होते. तेवढ्यात सिग्नल मिळाल्यामुळे गाडी सुटली. आॅर्थररोड येथे राहणाऱ्या सुनिल शर्मा (२८) या युवकाने धावत येऊन गाडी पकडण्याचा प्रयत्न केला; पण पायातील बूट सटकल्यामुळे प्लॉटफार्म गॅपमध्ये शर्मा दूरवर फरफटत गेला. उभ्या असलेल्या लोकांनी आरडाओरड केल्यामुळे प्रवाशांनी चैन ओढून गाडी थांबवली. त्यास कसेबसे बाहेर काढले असता त्यांच्या डोक्याला, हातापायाला गंभीररित्या मार लागल्याने रक्तस्त्राव सुरू होता. त्यास उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे ठाणे रेल्वे स्टेशन पोलिसांनी सांगितले.