शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सदुसष्ट वर्षांच्या ‘तरुण’ धावपटूचा करिष्मा

By admin | Updated: April 13, 2017 21:52 IST

कणदूरचे सेवानिवृत्त शिक्षक : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्साही सहभाग

सहदेव खोत-- पुनवत --आत्मविश्वास असेल तर वयाची बंधने तोडून माणूस यशाचे शिखर गाठू शकतो, हे सिद्ध करून दाखविले आहे कणदूर (ता. शिराळा) येथील सेवानिवृत्त शिक्षक गोरखनाथ केकरे यांनी. नुकत्याच नाशिक येथे झालेल्या मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत धावणे प्रकारात तीन कास्यपदके जिंकून त्यांनी दोन वर्षातील २५ पदकांचा टप्पाही पार केला. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी केलेली ही कामगिरी सर्वांना चकित करणारी ठरली आहे.गोरखनाथ केकरे कणदूरच्या दत्त विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक. सांगली जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे सक्रिय सदस्य. लेखक, वक्ते, कवी अशीही त्यांची सर्वत्र ओळख. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आणखी एका क्षेत्रात भरारी मारली आहे, ती म्हणजे क्रीडा क्षेत्रात. ज्येष्ठांच्या धावणे, चालणे, रिले या क्रीडा स्पर्धेत गेल्या दोन वर्षात केकरे यांनी राज्यपातळीपासून मलेशियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत एकूण २५ वर पदके जिंकून, वयाच्या साठीनंतर तरुणांना लाजवेल अशी कामगिरी केली आहे. क्रीडा क्षेत्राबरोबरच इतर आवडीही ते मनापासून जपत हा छंद जोपासत आहेत.केकरे यांनी राज्यातील कोल्हापूर, अंबरनाथ, नाशिक, मुंबई, येथील स्पर्धांबरोबरच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश या राज्यात राष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या आहेत.नियमित व्यायाम, योग्य आहार, आत्मविश्वास व जिद्द या चतु:सूत्रीमुळेच केकरे यांनी आज वयाच्या ६७ व्या वर्षीही असे उज्ज्वल यश मिळविले आहे.केकरे यांनी गतवर्षी मलेशियात आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ५ कि.मी. चालणे प्रकारात रौप्यपदक जिंकले आहे.