शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

रुंगटा, गोयनकाचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे

By admin | Updated: August 10, 2015 23:10 IST

हायकोर्टाकडून दिलासा नाही, प्रकरणामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता.

अकोला : भारतीय सेवा सदनद्वारा संचालित असलेल्या वसतिगृहातील रोजंदारी कर्मचार्‍याचा लैंगिक छळ करणारे संस्थेचे माजी अध्यक्ष निरंजनकुमार गोयनका आणि सचिव जुगलकिशोर रुंगटा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी मागे घेतला. उच्च न्यायालयाकडून या दोन्ही आरोपींना कोणताही दिलासा मिळाला नसून, त्यांनी जामिनासाठी खालच्या न्यायालयाकडे अर्ज सादर करावा, असा सल्ला न्यायालयाने दिला आहे. राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात रोजंदारीवर काम करणार्‍या पीडित युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याला कायमस्वरूपी नोक रीचे आमिष दाखवून निरंजनकुमार गोयनका व जुगलकिशोर रुंगटा यांनी त्याचा आठ वर्ष (२00८ ते २0१५) सतत लैंगिक छळ केला; मात्र नोकरीत कायम केले जात नसल्याचे पाहून युवकाने आरोपींच्या अश्लील चाळय़ांची चित्रफीत तयार केली. त्यानंतर युवकाने दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गोयनका व रुंगटा या दोघांविरुद्ध लैंगिक छळाचे गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल होताच दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती; मात्र अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयाने १५ जुलै रोजी दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

*रॅकेटचा भंडाफोड करणार

         सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. यात संस्थेशी संबंधित आणि काही बाहेरील व्यक्तिंचाही समावेश आहे. मुलींचा पुरवठा करण्यापासून, तर लोकांना अशा प्रकरणांमध्ये अडकवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे धंदे या रॅकेटकडून सुरू आहेत. या सर्वांंचा भंडाफोड लवकरच होण्याची शक्यता आहे.