शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या खासदारांचे पक्षांतर ही अफवा

By admin | Updated: May 29, 2017 04:08 IST

‘राष्ट्रवादी काँग्रेस हा बलाढ्य पक्ष असल्याने पक्षाची प्रतीमा मलीन करण्याचा विरोधकांकडून वारंवार प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘राष्ट्रवादी काँग्रेस हा बलाढ्य पक्ष असल्याने पक्षाची प्रतीमा मलीन करण्याचा विरोधकांकडून वारंवार प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीचे तीन खासदार भाजपच्या संपर्कात अशा अफवा पसरवल्या जात आहेत,’अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, धनंजय महाडिक व उदयनराजे भोसले हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या बातम्यांबाबत विचारले असता तटकरे म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे सिद्ध झाले आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने विरोधकांकडून राष्ट्रवादीची प्रतीमा मलीन करण्याचे काम सुरू आहे. जनतेत संभ्रम निर्माण केले जात आहेत. मात्र, अशा प्रकाराला कोणीही बळी पडणार नाही. पक्ष नेतृत्व शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. तसेच पक्ष संघटना मजबूत असून कोणाकडूनही पक्षांतर होणार नाही.’ भाजप सरकार शेतकरी विरोधी असून शेतकरी आत्महत्येबद्दल शासन गंभीर नाही. राज्य सरकारच्या धोरणामुळे गेल्या अडीच वर्षात १० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एकंदरीत ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे, असा आरोपही त्यांनी केला.उदयनराजेंविषयी भाष्य टाळले !खासदार उदयनराजे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ते साताऱ्यात नाहीत. त्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, ‘कोणता गुन्हा दाखल आहे, कशाबद्दल आहे, याची मला माहिती नाही. त्यामुळे या विषयी मी अधिक भाष्य करू शकत नाही.’१ जूनपासून राज्याचा दौरा येत्या १ जूनपासून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व शहर व जिल्ह्यात दौरा काढणार अहोत. यात लोकांचे प्रश्न समजून घेऊ.- सुनील तटकरे,प्रदेशाध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस