शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारीच आमने-सामने

By admin | Updated: October 19, 2016 04:22 IST

आश्वासन कागदावरच राहिल्याचा आरोप करीत लवकरच एमआयडीसीवर मोर्चा काढण्याचा पवित्रा कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी घेतला

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांसाठी अतिरिक्त पाण्याचा कोटा देण्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे आश्वासन कागदावरच राहिल्याचा आरोप करीत लवकरच एमआयडीसीवर मोर्चा काढण्याचा पवित्रा कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी घेतला आहे. अतिरिक्त कोट्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना शिवसेनेने घेतलेली भूमिका म्हणजे एक प्रकारे श्रेय लाटण्याचा प्रकार असल्याचा टोला भाजपाने लगावला आहे. यामुळे रस्ते विकासासह अतिरिक्त पाण्याच्या कोट्यावरूनही केडीएमसीतील हे सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे.२७ गावांना एमआयडीसीकडून ३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात पाण्याअभावी लागू झालेल्या पाणीकपातीत १७ ते १८ दशलक्ष लीटर पाणी ग्रामीण भागाला मिळत होते. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडूनही आजघडीला पिण्याच्या पाण्याची कमतरता २७ गावांमध्ये भेडसावत आहे. महिनाभरापूर्वी ग्रामीण भागातील भाजपाच्या नगरसेवकांनी जलसंपदामंत्र्यांची भेट घेऊन अतिरिक्त ३० दशलक्ष लीटर पाणी द्यावे, अशी मागणी केली होती. यावर, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेअंती प्रतिदिन वाढीव १७ दशलक्ष लीटर पाणी देऊ, या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. परंतु, जलसंपदामंत्र्यांनी आदेश देऊन एक महिना उलटला तरी याची अंमलबजावणी झालेली नाही, याकडे भोईर यांनी लक्ष वेधले आहे. जो कोटा होता, त्यातही कपात केल्याने पाणीटंचाईची भीषण परिस्थिती गावांमध्ये उद्भवली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. यांसदर्भात खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही पत्रव्यवहार करून अतिरिक्त पाण्याच्या कोट्याकडे लक्ष वेधल्याचे भोईर यांनी सांगितले. परंतु, याची अंमलबजावणी न झाल्याने एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे ते म्हणाले. बारवी धरणाची उंची वाढल्याने दीडपट पाणी वाढले, त्याचे काय झाले, असा सवालही भोईरांनी केला आहे. >सेना शिष्टमंडळ जलसंपदा मंत्र्यांच्या भेटीला एकीकडे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी अपुऱ्या पाणी कोटयासंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला असताना मंगळवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २७ गावांसाठी अतिरीक्त २० दशलक्ष लिटर पाणी द्यावे अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना केली. यावर महाजन यांनी २० दशलक्ष लिटर पाणी उचलण्याचे आदेश एमआयडीसीला दिले असल्याची माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. शिष्टमंडळात महापौर देवळेकरांसह सभागृहनेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण ग्रामीणचे प्रकाश म्हात्रे, सुखदेव पाटील, एकनाथ पाटील उपस्थित होते. महाजन यांच्या निर्णयामुळे २७ गावांना मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध होणार असल्याचे देवळेकर म्हणाले.