शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नियम तुडवीत भूदानातील जमिनीची विक्री, हस्तांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2015 04:01 IST

भूमिहिनांना जमिनी मिळाव्या म्हणून आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ राबविली़ यात लाखो हेक्टर जमिनी विनोबांना दानात मिळाल्या

प्रशांत हेलोंडे, वर्धाभूमिहिनांना जमिनी मिळाव्या म्हणून आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ राबविली़ यात लाखो हेक्टर जमिनी विनोबांना दानात मिळाल्या; पण या जमिनीच्या वाटपात मोठा घोळ आहे़ जिल्ह्यातील सुमारे २ हजार हेक्टर जमिनीच्या वाटपात निकषांना तिलांजली देत मनमानी वाटप केल्याचे उघड झाले़ भूदानातील जमिनीचे हस्तांतरण, विक्री होत नाही; पण नियम तुडवीत वर्धा जिल्ह्यात सररास जमिनीची विक्री करण्यात आल्याचेही माहिती अधिकारात प्राप्त सातबारा प्रमाणपत्रांतून निदर्शनास येते़केंद्र शासन पुरस्कृत आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान यज्ञात जिल्ह्यात १९८०़४९ हेक्टर आर जमीन प्राप्त झाली़ यातील १८६१़९४ हेक्टर आर जमिनीचे वाटप केले़ आता जिल्ह्यात भूदानातील केवळ ११८़५५ हेक्टर आर जमीन शिल्लक आहे़ या जमिनीवरही भूखंडमाफियांची काकदृष्टी आहे़ वर्धा तालुक्यात सर्वाधिक ३५५़१४ हे़आऱ जमीन प्राप्त झाली व ३३७़१ हे़आऱ वितरित करण्यात आली़ तालुक्यात भूदानाची केवळ १८़०४ हे़आऱ जमीन शिल्लक आहे़ वर्धा तालुक्यात वर्धा, सेवाग्राम, वायगाव (नि़), तळेगाव (टा़), आंजी (मोठी) आणि वायफड अशी सहा मंडळे आहेत. या सहा मंडळांमध्ये भूदानात प्राप्त जमिनीचे वाटप अल्पभूधारक, भूमिहीन, निवृत्त सैनिक यांना होणे क्रमप्रात होते; पण तसे झाले नाही़ बहुतांश जमिनी संस्थानिक, ले-आउटधारकांच्या घशात घातल्याचेच दिसते़ वर्धा मंडळात ४० सर्व्हे क्रमांकातील ४८़२७ हे़आऱ जमीनवाटप करण्यात आली़ यातील एका ३़४७ हेक्टर आर जमिनीवर तीन बँकांनी तब्बल ९८़२९ कोटी रुपयांचे कर्ज दिल्याची नोंद सातबाऱ्यामध्ये करण्यात आली आहे़ ही जमीन भूदानधारकाने हक्क सोडल्यावर एका संस्थेला हस्तांतरित झाल्याचे नमूद करण्यात आले आहे़ वास्तविक, भूदानात वितरित जमिनीचा व्यावसायिक वापर करता येत नाही; पण सदर जमिनीचा गत कित्येक वर्षांपासून व्यावसायिक वापर होत आहे़ असाच प्रकार तालुक्यातील भूदानात प्राप्त अन्य जमिनींबाबतही झाला आहे़ सेवाग्राम मंडळात ५२़९१ हे़आऱ जमिनीचे वाटप केले़ वायगाव मंडळात २२़९२ हे़आर., तळेगाव (टा़) मंडळात ६०़२५ हे़ आऱ, आंजी (मोठी)मध्ये सुमारे ५० हे़आर. तर वायफड मंडळात सर्वाधिक १०३ हे़आऱ जमिनीचे वाटप करण्यात आले़ यातील बहुतांश जमिनींवर ले-आउट विकसित झाल्याचे चित्र आहे़