शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

‘भीमा-पाटस’ची सत्ताधाऱ्यांनी वाट लावली

By admin | Updated: May 17, 2016 02:13 IST

गेल्या १६ वर्षांत भीमा-पाटस साखर कारखान्याची वाट लागली असून, सभासदांच्या प्रपंचाशी खेळणाऱ्यांचा डाव उघडा पडला आहे.

राहू : गेल्या १६ वर्षांत भीमा-पाटस साखर कारखान्याची वाट लागली असून, सभासदांच्या प्रपंचाशी खेळणाऱ्यांचा डाव उघडा पडला आहे. शेतकऱ्यांच्या उसाला भाव नाही, तर कामगारांचे पगार थकलेले आहेत. त्यामुळे जनता आता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे मत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी व्यक्त केले.खामगाव (ता. दौंड) येथील एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या वर्षभरात तालुक्यात सूडाचे राजकारण चालू असून गेली पंधरा वर्षे आमदारकी कुल कुटुंबीयांच्या घरामध्ये असताना त्यांना स्वत:च्या गावामध्ये वीज, पिण्याचे पाणी, शाळा अशा गोष्टी करता आल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. भांडगाव परिसरात सुरू केलेली शिक्षण संस्था काही वर्षांत बंद करावी लागली आणि आता भीमा पाटस कारखान्याची परिस्थिती विचारात घेतली तर तालुक्यातील दौंड शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा, अनुराज शुगर हेही कारखाने तालुक्यातील ऊस गाळतात, तर सर्वात कमी रिकव्हरी भीमा पाटसची आहे. साखर कारखाना चांगला चालला आहे, अशा वल्गना केल्या जातात. कामगारांचे सात-सात महिन्यांचे पगार कसे थकतात. खोटे बोला पण रेटून बोला हे आम्ही आता चालू देणार नाही, हे मी बोललेले खोटे वाटत असेल एकदा आमने-सामने होऊन जाऊ द्या, असे थोरात म्हणाले.या वेळी वैशाली नागवडे, महेश शेळके, राजेंद्र बहिरट, संजय यादव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला नितीन दोरगे, विजय नागवडे, दत्तोबा तांबे, जगन्नाथ नागवडे, बाजार समितीचे सभापती विठ्ठल थोरात, काका तापकीर, उपसरपंच संदीप जगताप, अनिल नागवडे, अजय थोरात, नीलेश म्हेत्रे, विशाल म्हेत्रे, योगेश जगताप, नानासाहेब दळवी, बाबासाहेब कोळपे, कैलास सुरेश नागवडे, कोळपे माजी सरपंच संजय जगताप, अविनाश जगताप, काळुराम नागवडे, नागेश नागवडे व ग्रामस्थ उपस्थित होते.