शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘नियमानुसार काम’ आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: January 31, 2017 02:27 IST

मध्य रेल्वे प्रवाशांना तांत्रिक बिघाडांचा सामना करावा लागत असतानाच मोटरमन, गार्ड आणि रेल्वे प्रशासनातील अंतर्गत वादाचा सामना प्रवाशांनाही करावा लागणार आहे. कामाच्या वेळा ठरवण्यासाठी

मुंबई : मध्य रेल्वे प्रवाशांना तांत्रिक बिघाडांचा सामना करावा लागत असतानाच मोटरमन, गार्ड आणि रेल्वे प्रशासनातील अंतर्गत वादाचा सामना प्रवाशांनाही करावा लागणार आहे. कामाच्या वेळा ठरवण्यासाठी नेमण्यात आलेली समिती रेल्वेकडून रद्द करण्यात आल्याने त्याचा निषेध म्हणून १ फेब्रुवारी रोजी मोटरमन आणि गार्डकडून नियमानुसार काम आंदोलन करण्याचा इशारा विविध संघटनांनी दिला आहे. त्यामुळे लोकल सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. लोकलचे मोटरमन आणि गार्ड यांच्या कामाच्या वेळा ठरवण्यासाठी एक समिती असते. या समितीमध्ये मोटरमन व गार्ड यांच्यापैकी प्रत्येकी दोन असे मिळून चार सदस्य असतात. त्यासाठी अंतर्गत निवडणुका होऊन सदस्यांची निवड केली जाते. मात्र या निवडणुका रेल्वे प्रशासनाकडून रद्द करण्यात आल्या आहेत. हा निर्णय कामगारांसाठी घातक असल्याची टीका रेल्वे कामगार सेना, एससी-एसटी रेल्वे कामगार संघटनांसह विविध संघटनांनी केला आहे. या निर्णयाचा निषेध म्हणून सोमवारी मोटरमन आणि गार्डकडून काळ्या फिती लावून काम करण्यात आले. मात्र याबाबत योग्य निर्णय घेतला नाही, तर १ फेब्रुवारी रोजी नियमानुसार काम आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. मोटरमन आणि गार्डकडून ठरलेल्या वेळेपेक्षाही जादा काम केले जाते. मात्र हे काम न करता नियमानुसार काम केल्यास त्याचा परिणाम लोकल सेवेवर होण्याची शक्यता आहे. सध्या जादा लोकल फेऱ्या आणि अन्य कामे पाहता मोटरमन व गार्डवर कामाचा ताण पडतो. नियमानुसार काम केल्यास त्याचा फटका लोकल सेवेला बसू शकतो. (प्रतिनिधी)