शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

रखडपट्टीचा मोठा फटका

By admin | Updated: November 29, 2014 23:57 IST

महाराष्ट्राच्या नव्या सरकारपुढे जी महत्त्वाची आव्हाने उभी आहेत त्यात रखडलेल्या प्रकल्पांचा सर्वात वरचा क्रमांक लागतो.

महाराष्ट्राच्या नव्या सरकारपुढे जी महत्त्वाची आव्हाने उभी आहेत त्यात रखडलेल्या प्रकल्पांचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. विकासाचे राजकारण करताना या प्रकल्पांचा फेरआढावा घेत हे प्रकल्प वेगाने कसे पूर्ण होतील यावर भर देणो, ही नव्या सरकारची तातडीची गरज बनली पाहिजे. मुंबईपासून विदर्भार्पयत काही महत्त्वाच्या रखडलेल्या प्रश्नांचा धांडोळा. नव्या सरकारला नव्या दमाने आणि नव्या उमेदीने या प्रकल्पांना हात घालायला हवा तरच विकासाचा खरा वेग प्राप्त होऊ शकेल.
 
देशात रखडलेल्य्ां विकासकामांची मोठी जंत्री आहे. प्रत्येक तिसरा प्रकल्प रखडल्याने प्रकल्पांच्या किमतीत एक लाख कोटीहून अधिकची वाढ झाल्याची माहिती केंद्र सरकारच्याच सांख्यिकी विभागाने दिली आहे. एकटय़ा मुंबईत 6क् हजार कोटींहून अधिकची पायाभूत विकासकामे संथगतीने सुरू आहेत.
 
मुंबईतील रखडलेल्या कामांची व्याप्ती आहे मंत्रलयापासून नवी मुंबई विमानतळार्पयत.. दक्षिण टोकाला असणा:या मंत्रलयाच्या इमारतीला दोन वर्षापूर्वी आग लागली. त्यात पाचवा आणि सहावा मजला जळून खाक झाला. त्यानंतर सुरू झालेले दुरुस्तीचे काम अद्याप सुरूच आहे. नवीन सरकार सत्तेत येऊनही दुरुस्तीचे काम सुरूच असून, त्याचा खर्च मात्र 138 कोटींवरून 285 कोटींर्पयत पोहोचला. नवी मुंबई विमानतळाचीही हीच गत. 1998 साली 4क् दशलक्ष प्रवाशांचे ध्येय ठेवून साकारण्यात येणा:या विमानतळाचा खर्च 4 हजार 766 कोटी आखण्यात आला होता. विविध कारणांमुळे विमानतळ रखडतच राहिले. आता मात्र त्याच प्रकल्पाची किंमत 14 हजार 573 कोटींवर पोहोचली आहे. प्रकल्पाच्या किमतीत झालेली ही वाढ 3क्5} टक्क्याहून अधिक आहे. मुंबई महानगरातील सर्वच प्रकल्पांची अवस्था कमी-अधिक प्रमाणात अशीच आहे. मुंबई महापालिकेपासून एमएमआरडीए, अशा 17हून अधिक संस्था मुंबई महानगरात विकासकामात व्यस्त आहेत. या सर्व विकास प्राधिकरणांमध्ये समन्वयाच्या अभावामुळे कुणाचा पायपोस कुणाला नसल्याचे चित्र आहे. त्याचा फटका साहजिकच विकासकामांना बसतो आहे. 1क् हजार कोटींचा मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोड, तितक्याच खर्चाचा कोस्टल रोड, सी-लिंक, जलवाहतूक अशा पर्यायांची निव्वळ घोषणा व चर्चाच पाहायला मिळते. गेल्या वर्षभरात काही प्रकल्प पूर्णत्वास आले; पण झालेल्या विलंबामुळे वाढलेल्या खर्चाचा आकडा चक्रावणारा आहे. 
 
- गौरीशंकर घाळे