शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मूर्तीच्या गळ्यापर्यंत किरणे

By admin | Updated: November 10, 2016 23:59 IST

दक्षिणायन सोहळा : दुसऱ्या दिवशी किरणोत्सवाची तीव्रता १५ लक्स

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) सूर्यकिरणे अंबाबाईच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत आली. महाद्वार रोडपासून प्रवास करीत ही किरणे ५ वाजून ४९ मिनिटांनी अंबाबाईच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत येऊन लुप्त झाली. आज, शुक्रवारी किरणोत्सवाचा अखेरचा दिवस असून, सूर्यकिरणांची तीव्रता चांगली राहिली तर किरणे मूर्तीच्या चेहऱ्यावर येऊन किरणोत्सव पूर्ण होण्याची शक्यता आहे. अंबाबाईच्या किरणोत्सवाला बुधवार (दि. ९)पासून सुरुवात झाली. मात्र, लीप वर्ष असेल तेव्हा किरणोत्सव ८ नोव्हेंबरपासून सुरू होतो. त्यानुसार मंगळवारी (दि. ८) किरणे अंबाबाई मूर्तीच्या चरणांपर्यंत, तर बुधवारी कमरेपर्यंत आणि गुरुवारी गळ्यापर्यंत आली होती. गुरुवारी संध्याकाळी ५ वाजून ५६ मिनिटांनी सूर्यास्त होता. ४ वाजून ४८ मिनिटांनी महाद्वार रोडपासून सुरू झालेला किरणांचा प्रवास ५ वाजून ४९ मिनिटांनी अंबाबाईच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत येऊन पूर्ण झाला. त्यानंतर किरणांची तीव्रता कमी होऊन ती लुप्त झाली. यावेळी सूर्यकिरणांची तीव्रता १५ लक्स इतकी होती. गुरुवारी सूर्यकिरणांची तीव्रता चांगली होती. आकाश स्वच्छ आणि निरभ्र होते. ही तीव्रता आज, शुक्रवारीदेखील अशीच राहिली तर किरणे अंबाबाई मूर्तीच्या चेहऱ्यावर पडून किरणोत्सव पूर्ण होऊ शकेल, अशी माहिती प्रा. मिलिंद कारंजकर यांनी दिली.सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या चेहऱ्यावर येण्यासाठी आणखी दोन मिनिटांचा कालावधी मिळणे गरजेचे आहे. सूर्यकिरणांची तीव्रता कमी असली तरी किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होण्यासाठी किरणांच्या मार्गातील अडथळे काढणे गरजेचे आहे.- प्रा. किशोर हिरासकर