शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील ‘आरटीओ’ सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2017 03:57 IST

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरात नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. अशा वाहनांना नोंदणी

मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरात नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. अशा वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून वाहन मालकांना त्याचा ताबा मिळावा यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालये (डेप्युटी आरटीओ) २८ मार्च रोजी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदीही केली जाते. त्यामुळे याच शुभमुहूर्तावर वाहनांची खरेदी होतानाच वाहन मालकांना त्याचा ताबाही मिळावा यासाठी राज्यातील सर्व आरटीओ सुरू ठेवली जातात. या दिवशी आरटीओकडून वाहनांना नोंदणी क्रमांक दिला जातो. यातून आरटीओला चांगला महसूल मिळतो. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गुढीपाडव्याच्या दिवशी आरटीओ व डेप्युटी आरटीओ सुरू ठेवण्याचा निर्णय परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही वेळेत उपस्थित राहून नोंदणी व कर वसुलीचे कामकाज करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे पाडव्याच्या मुहूर्तावर वाहनांचा ताबा वाहन मालकांना मिळावा म्हणून १९ मार्चला शनिवारी तसेच २५,२६ मार्चला शनिवार व रविवार असे दोन्ही दिवस आरटीओ सुरू ठेवण्यात आले होते. (प्रतिनिधी)दुय्यम निबंधक  कार्यालयेही खुली गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी बरेच जण सदनिका, शेत जमिनी तसेच इतर खरेदी, व्यवहार करण्यास प्राधान्य देतात. हे पाहता दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.