शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
2
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
3
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
4
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
5
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
6
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
7
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
8
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
9
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
10
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
11
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
12
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
13
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
14
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
15
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
16
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका
17
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
18
कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण
19
नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?
20
UPI युजर्ससाठी नवं फीचर; मँडेटही पोर्ट करता येणार, दुसऱ्या अॅप्सचे ट्रान्झॅक्शन्सही दिसणार, काय आहे नवी सुविधा?

आरटीओ होणार दलालमुक्त!

By admin | Updated: January 16, 2015 06:14 IST

राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना दलालांनी वेढा घातल्याने कामकाजाचे तीनतेराच वाजले आहेत. त्यामुळे आरटीओ कायमस्वरूपी दलालमुक्त करण्यासाठी आता परिवहन

मुंबई : राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना दलालांनी वेढा घातल्याने कामकाजाचे तीनतेराच वाजले आहेत. त्यामुळे आरटीओ कायमस्वरूपी दलालमुक्त करण्यासाठी आता परिवहन आयुक्त महेश झगडे यांनीच थेट लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. १७ जानेवारीपर्यंत आरटीओ कार्यालय दलालमुक्त करण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाची प्रतच सर्व आरटीओ कार्यालयांना पाठवली आहे. १९ जानेवारीपासून परिवहन आयुक्त आरटीओ कार्यालयांना अचानक भेट देणार असल्याने सगळ्याच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. आरटीओ कार्यालयांत दलालांचा नेहमीच राबता असल्याने वाहनचालकांना लायसन्स मिळवून देणे, त्याचे नूतनीकरण करणे यासह अन्य अंतर्गत कामातही दलालांकडून मोठ्या प्रमाणात ढवळाढवळ केली जाते. प्रत्यक्षात आरटीओ दलालमुक्त व्हावे यासाठी कुठलेच अधिकारी पुढाकार घेताना दिसत नाही. त्यामुळे दलालांचे वर्चस्व आरटीओ कार्यालयांत वाढल्याचे दिसून येते. परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी यासंदर्भात आरटीओ कार्यालयांना गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार आपली कार्यालये दलालमुक्त करण्याच्या सूचनाही केल्या. मात्र त्याकडे दुर्लक्षच झाल्याने त्याची गंभीर दखल परिवहन आयुक्तांकडून घेण्यात आली. आयुक्तांनी १२ जानेवारी रोजी थेट एक लेखी पत्रच तयार करून १७ जानेवारीपर्यंत आरटीओ दलालमुक्त करण्याचे आदेशच सर्व आरटीओंना दिले. त्याचबरोबर १९ जानेवारीपासून आपण आरटीओ कार्यालयांना भेट देऊन दलालांना हटविले की नाही याची पाहणी करणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत परिवहन आयुक्त महेश झगडे यांना विचारले असता, दोन महिन्यांपासून आरटीओ दलालमुक्त करा अशी सूचना अधिकाऱ्यांना केली जात आहे. आता तसे आदेशच त्यांना दिले आहेत. आदेशाची एक प्रतही परिवहन विभागाच्या वेबसाईटवर टाकली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)