शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

आरटीओ अधिकाऱ्यांची पळापळ

By admin | Updated: December 22, 2014 03:54 IST

या छाप्याची आरटीओमध्ये जोरदार चर्चा असून प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्याने दिलेली माहिती धक्कादायक असून, सरप्राईज भेटीची कहाणी हिंदी सिनेमात शोभावी अशी आहे.

अतुल कुलकर्णी ल्ल मुंबईपरिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर दररोज तब्बल २० लाखांची मलई परस्पर फस्त होत असल्याने महिन्याला करोडोंचा फटका सरकारी तिजोरीला बसत आहे. गुजरात बॉर्डरवरील आच्छाड सीमा तपासणी नाक्यावर परिवहन आयुक्तांनी दिलेल्या सरप्राइज भेटीनंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) हा गोरखधंदा उघड झाला आहे. ट्रकमधून आयुक्त उतरताना पाहून युनिफॉर्ममधील आरटीओ अधिकारीच पळत असल्याचे पाहून चक्क ट्रक ड्रायव्हर टाळ्या वाजवत होते.या छाप्याची आरटीओमध्ये जोरदार चर्चा असून प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्याने दिलेली माहिती धक्कादायक असून, सरप्राईज भेटीची कहाणी हिंदी सिनेमात शोभावी अशी आहे. सीमा तपासणी नाक्यांवर पैसे गोळा करणाऱ्या दलालांना थारा देऊ नका, असे आदेश आयुक्त महेश झगडे यांनी दिले होते. या आदेशाचे पालन होते का, हे पाहण्यासाठी आयुक्त एका खासगी गाडीतून आपल्या बॉडीगार्डसह निघाले. आच्छाड सीमा तपासणी नाक्याच्या अलीकडे त्यांनी गाडी थांबवून एक ट्रक थांबवला. टीशर्ट आणि जीन्स घातलेले आयुक्त आणि क्लिनरसारखा वेष केलेला बॉडीगार्ड त्यात बसले. आच्छाड नाक्याचा रस्ता आठ पदरी आहे. त्या ठिकाणी गाड्या वाट्टेल तशा जात होत्या. पहिल्या दोन लेनमधून ओव्हरलोड ट्रक जात होते. आयुक्त ज्या ट्रक मध्ये बसले होते, तो ट्रक नाक्यावर गेला. तेथे कागदपत्रे पाहणाऱ्याने ड्रायव्हरला आतल्या खोलीत जायला सांगितले. आतमध्ये त्याच्याकडून तीनशे रुपये घेतले गेले.‘त्याची पावती घे’, असे आयुक्तांनी ड्रायव्हरला सांगितले व ते ट्रकमधून खाली उतरले. त्यांना पहाताच ‘रेड पडली, रेड पडली’ असे म्हणत सगळे दलाल आणि युनिफॉर्ममधील अधिकारी देखील सुसाट पळत सुटले. यादरम्यान तेथे गर्दी जमली होती व अधिकाऱ्यांना दप्तर टाकून पळताना पाहून ट्रक ड्रायव्हरच टाळ्या वाजवत असल्याचे दृष्य तेथे पाहायला मिळाले. जमलेल्या ट्रक ड्रायव्हरनी रोज कसे पैसे द्यावे लागतात याच्या सुरस कहाण्या लिहून दिल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. नंतर एक आरटीओ आले. त्यांनी भीत भीत या नाक्याची कहाणी सांगितल्याचे वृत्त आहे. आच्छाड सीमा तपासणी नाक्यापासून काही अंतरावर गुजरात सरकारचा सीमा तपासणी नाका आहे. तेथे मात्र प्रत्येक ट्रकचे वजन जागेवरच असलेल्या काट्यांवर होत होते. त्यासाठीची स्वतंत्र यंत्रणा, कर्मचारी तेथे उपलब्ध असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. याबाबत आयुक्त झगडे यांना विचारले असता ते म्हणाले, आपण ट्रकमध्ये जाऊन भेट दिली हे खरे आहे; पण अधिवेशन सुरू असल्याने यावर बोलणे योग्य होणार नाही. या सगळ्या प्रकारावर आता चालू अधिवेशनात विरोधी पक्षनेते कोणती भूमिका घेतात हे पहाणे महत्वाचे असेल. आघाडी सरकारमध्ये हे खाते काँग्रेसकडे व त्यातही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होते. आता युती सरकारमध्ये हे दिवाकर रावते यांच्याकडे आहे.