शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पुढील वर्षापासून आरटीई प्रवेश बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 05:45 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के जागांवर गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शासनाकडून खासगी इंग्रजी शाळांना सक्ती केली जाते. परंतु, त्या विद्यार्थ्यांचा शुल्क परतावा देण्याबाबत शासनाकडून शाळांना ठेंगा दाखविला जात आहे.

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के जागांवर गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शासनाकडून खासगी इंग्रजी शाळांना सक्ती केली जाते. परंतु, त्या विद्यार्थ्यांचा शुल्क परतावा देण्याबाबत शासनाकडून शाळांना ठेंगा दाखविला जात आहे. राज्यभरातील शाळांना शुल्क परताव्यापोटी तब्बल ३४५ कोटी रुपये मिळणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून आरटीई प्रवेश न देण्याचा पवित्रा इंग्रजी शाळांनी घेतला आहे.समाजातील आर्थिक व सामाजिक मागासवर्गीय घटकातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने केंद्र शासनाच्या आरटीई कायद्याअंतर्गत २०१३-१४ पासून खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्यात येतात. त्यासाठी शासनाकडून काही शाळांना तीन वर्षे एका विद्यार्थ्यामागे साडेबारा हजार रुपयांपासून सतरा हजार सहाशे रुपयांपर्यंत रक्कम शुल्क परवावा म्हणून टप्प्याटप्प्याने देण्यात आली. पाच वर्षांत शिक्षण विभागाकडून एकूण केवळ १०४ कोटी रुपये शाळांना देण्यात आले आहेत. आरटीई प्रवेश न दिल्यास शाळांना नोटीस बजावून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. परंतु, शुल्काची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जाते आहे.आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्कापोटी किती रक्कम शाळांना द्यावी याबाबतची मंजूरी शिक्षण विभागाला शासनाकडून घ्यावी लागते. २०१७-१८या शैक्षणिक वर्षात राज्यातील आरटीई प्रवेश क्षमतेच्या १ लाख २० हजार ८२२ जागांपैकी ६३ हजार ८९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.>शासनाकडून परतावा मिळत नसल्याने पालक-विद्यार्थ्यांसोबत डिसेंबरमध्ये मंत्रालयावर मोर्चा काढला जाईल. तसेच पुढील वर्षापासून आरटीईचे प्रवेश थांबविले जाणार आहेत.- संजय तायडे पाटील,अध्यक्ष, मेस्टा>वेळेत शुल्क परतावा दिला जात नसल्याने संघटनेने शासनाला नोटीस बजावली आहे. तसेच पुढील वर्षापासून आरटीई प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी न करण्याचाही निर्णय आम्ही घेतला आहे.- जागृती धर्माधिकारी, अध्यक्ष, इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल्स असोसिएशन