शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

महिला प्रवेशासाठी आरएसएस अनुकूल

By admin | Updated: March 12, 2016 04:13 IST

शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर येथील मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू देण्याचा मुद्दा तापला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथमच त्याबाबत

योगेश पांडे, नागपूरशनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर येथील मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू देण्याचा मुद्दा तापला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथमच त्याबाबत भूमिका स्पष्ट करताना महिलांना सर्व मंदिरांत प्रवेश करण्याचा हक्क असल्याचे म्हटले आहे.महिलांना प्रवेश न देण्याची परंपरा अनुचित असून, अशा मंदिर व्यवस्थापनांशी यावर चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचे मत संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मांडले आहे. सोबतच या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली आहे.राजस्थान येथील नागौर येथे संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेमध्ये संघाने यावर आपली बाजू मांडली आहे. भारतात प्राचीन काळापासून धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात महिला व पुरुषांचा सहज सहभाग राहिला आहे. हीच देशाची परंपरा आहे. सर्व मंदिरांत स्त्री-पुरुष भेदभाव न पाळता प्रवेश देण्यात येतो. महिलांकडून वेदाध्ययन, पौरोहित्यदेखील केले जाते. त्यामुळे त्यांना मंदिरांमध्ये प्रवेश नाकारण्याचे काहीच कारण नाही, असे प्रतिपादन भैयाजी जोशी यांनी केले आहे. महिलांना मंदिरात प्रवेश न देण्याची अनुचित परंपरा काही ठिकाणी दिसून येते. परंतु जेथे वाद आहेत तेथे संबंधितांशी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. विषयाचे राजकारण करणे किंवा आंदोलनाचीच भूमिका घेणे हे समस्येचे समाधान असू शकत नाही. समाज, धार्मिक क्षेत्र, मंदिर व्यवस्थापन यांच्या एकत्रित प्रयत्नांतून एकूण मानसिकताच बदलण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे, अशी सूचना संघातर्फे करण्यात आली आहे.