शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांंमुळे ८७० कोटींचा तोटा

By admin | Updated: February 3, 2016 03:55 IST

भुजबळ कुटुंबियांचा सहभाग असलेल्या घोटाळ्यातून अर्थखात्याला तब्बल ८७० कोटी रुपयांचा तोटा झाला असून, त्यापैकी ११४ कोटी रुपयांसंबंधित गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

मुंबई : भुजबळ कुटुंबियांचा सहभाग असलेल्या घोटाळ्यातून अर्थखात्याला तब्बल ८७० कोटी रुपयांचा तोटा झाला असून, त्यापैकी ११४ कोटी रुपयांसंबंधित गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. उर्वरित ७५० कोटी रुपयांसंबंधित गुन्ह्यांची माहिती घेणे अजून सुरू आहे, असे अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयाला सांगितले. समीर भुजबळ हे मनी लाँडरिंग प्रकरणातील प्रमुख संशयित असल्याचे सांगत संचलनालयाने त्यांच्या कोठडीची मागणी केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. भावके यांनी दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर समीर यांना ८ फेबु्रवारीपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.माजी खासदार समीर भुजबळ यांना मंगळवारी पहाटे एकच्या सुमारास अटक करण्यात आल्यानंतर मंगळवारी सांयकाळी ४ वाजता त्यांना येथे न्यायालयात हजर करण्यात आले. तत्पूर्वी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी सेंट जॉर्ज रूग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी समीर हे त्रस्त दिसत होते. यावेळी सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारीही मोठ्या संख्येने हजर होते. समीर म्हणाले की, आपल्याला अटक करण्याची काहीही गरज नव्हती. कारण आपण आवश्यक ते सर्व कागदपत्रे ईडीला दिले आहेत. राजकीय सूडभावनेतून आपल्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोपाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, आपल्याविरुद्ध कारवाई होणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांना अगोदरच कशी मिळाली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. सहकार्य करूनही केली गेली अटकमला चौकशीसाठी बोलविले त्यावेळी मी व्यस्त होतो. पण, दोघांनाही सोयीची ठरेल अशी तारीख निश्चित करण्याबाबत मी लेखी पत्र दिले होेते. खारघर पोलिसात याबाबत माझा जबाब दिलेला आहे. सोमवारी मी तपास अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले तथापि, मंगळवारी पहाटे एक वाजता मला अटक करण्यात आली.> मी मागास असल्यानेच कारवाई - भुजबळ पुतण्या समीर यांस ईडीने अटक केल्याची वार्ता समजताच सध्या अमेरिकेत असलेले छगन भुजबळ यांनी तातडीने एक व्हिडीओ जारी करून आपले म्हणणे प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविले. आपण ओबीसी असून, मागास वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करीत असल्यानेच आपल्याविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई केली जात असून, हे एक राजकीय षडयंत्र आहे, असा दावा भुजबळ यांनी त्या व्हिडीओत केला आहे.कारवाई नियमानुसारच- रावसाहेब दानवेराष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेले आरोप चुकीचे असून, भुजबळ यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने नव्हे, तर भ्रष्टाचाराच्या आरोपात तथ्य आढळल्यानेच केली आहे. शिवाय न्यायालयाने आदेश देऊन ईडी विभागाच्या चौकशीस सहकार्य करीत नसल्यानेच माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक करण्यात आल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना केला.