शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुगाला मिळणार ४२५ रुपये बोनस!

By admin | Updated: September 24, 2016 03:08 IST

आधारभूत दराने खरेदी करणारे पहिले केंद्र उघडले अकोल्यात.

अकोला, दि. २३- शासनाच्या आधारभूत दराने शासकीय मूग खरेदीला राज्यात प्रथम अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती येथून प्रारंभ झाला आहे. त्यानंतर राज्यात ४९ मूग खरेदी केंद्र उघडण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, मुगाला यावर्षी प्रतिक्विंटल ४२५ रुपये बोनस दिला जाणार आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर एफएक्यू दर्जाच्या मुगाची खरेदी होत असून, दर ४,८00 रुपये प्रतिक्विंटल व बोनस ४२५ रुपये प्रतिक्विंटल शासनाने जाहीर केला आहे. शेतकर्‍यांना आपला शेतमाल स्वच्छ करू न व वाळवून तसेच सोबत ओळखपत्र, सात-बारा मूग पेरणीचा दाखला आणावा लागणार आहे. महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटिंगद्वारे मुगाची खरेदी केली जात आहे. राज्यात यावर्षी मुगाचे क्षेत्र वाढले असून, काही ठिकाणी एकरी ५ ते ६ क्विंटल मुगाचे उत्पादन झाले आहे; पण गत दोन महिन्यांपूर्वी ९ ते १0 हजार रुपये क्विंटल असलेले मुगाचे दर आजमितीस सरासरी ४,६0५ रुपये प्रतिक्विंटलवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. मुगाची आधारभूत किंमत ४,८00 रुपये प्रतिक्विंटल आहे. बाजारात मात्र सरासरी ४,६0५ प्रतिक्विंटल दर आहेत. याचे कारणच आधारभूत दराने खरेदी करताना अनेक चाळण्या लावण्यात आल्याने शेतकर्‍यांना बाजारात विकण्यापासून पर्याय उरला नाही. परिणामी, बाजारात शेतकर्‍यांची प्रचंड लूट होत आहे.