शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेसाठी ३० हजार कोटींचा निधी उभारणार

By admin | Updated: May 15, 2016 04:50 IST

मागील अनेक वर्षांपासून मुंबईतील रेल्वेच्या पायाभूत सेवा-सुविधांचा विकास करण्यासाठी निधी देण्यात आलेला नाही. परिणामी, रेल्वे मार्गांकडे दुर्लक्ष झाले आहे.

मुंबई : मागील अनेक वर्षांपासून मुंबईतील रेल्वेच्या पायाभूत सेवा-सुविधांचा विकास करण्यासाठी निधी देण्यात आलेला नाही. परिणामी, रेल्वे मार्गांकडे दुर्लक्ष झाले आहे. आता मात्र, अशी चूक होऊ देणार नाही, अशी ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. मुंबईतील रेल्वेच्या विकासासाठी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांच्या एकत्रित प्रयत्नातून ३० हजार कोटींचा निधी उभारण्यात येणार असल्याचेही प्रभू यांनी सांगितले. कांजूर मार्ग आणि विद्याविहार स्थानकातील प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी सुरेश प्रभू बोलत होते. दादर येथे शनिवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी व्हिडीओद्वारे या प्रकल्पांचे लोकार्पण केले. सुरेश प्रभू यांनी या वेळी प्रवाशांना तत्काळ माहिती मिळेल, अशा सुविधेची घोषणा केली. आता रेल्वे का खोळंबली आहे, याची माहिती देणारे फलक फलाटांवर लावले जाणार आहेत. याच फलकावर रेल्वेसेवा कधी पूर्ववत होईल याचीही माहिती प्रवाशांना दिली जाणार आहे. प्रवाशांचा खोळंबा होऊ नये, चिडचिड कमी व्हावी आणि त्याचबरोबर स्टेशन मास्तरांची डोकेदुखी कमी व्हावी यासाठी ही सुविधा देण्यात येणार आहे. याचबरोबर रेल्वे प्रशासन करत असलेल्या विकासकामांच्या फलकांचाही यात समावेश असणार आहे, असे प्रभू यांनी सांगितले.वर्षानुवर्षे स्टेशन मास्तरांच्या पांढऱ्या युनिफॉर्मचा रंग आता बदलणार आहे. त्यामुळे यापुढे स्टेशन मास्तर वेगळ्या रंगाच्या युनिफॉर्ममध्ये दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या फॅशन डिझायनर रितू बेरी यांच्याशी युनिफॉर्मविषयी चर्चा सुरू असल्याचेही प्रभू यांनी स्पष्ट केले. युनिफॉर्ममध्ये तर बदल होणार आहेतच त्याचबरोबरीने त्यांच्या अधिकारांतही वाढ करण्यात येणार आहेत. त्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही प्रभू यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)