शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महापालिकेला सहा महिन्यांत २८० कोटींचा निधी

By admin | Updated: May 22, 2017 02:15 IST

विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, केंद्रात, राज्यात तसेच सिडकोसारखे महामंडळ भाजपाच्या ताब्यात असल्यामुळे या ठिकाणचा विकास आम्हीच करू शकतो

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, केंद्रात, राज्यात तसेच सिडकोसारखे महामंडळ भाजपाच्या ताब्यात असल्यामुळे या ठिकाणचा विकास आम्हीच करू शकतो. पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन केवळ ६ महिने झाले आहेत. मात्र, आतापर्यंत २८० कोटी रुपयांचा निधी पनवेलसाठी मंजूर केला आहे. त्यामुळे या परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास होणार असल्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी खारघर येथील सभेत दिले. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यावर पनवेलमधील जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे पनवेल महापालिका भाजपाच्याच ताब्यात येईल. महाराष्ट्रातील ५० टक्के लोकसंख्या शहरात राहते. शहरीकरण होताना नियोजनबद्ध विकास गरजेचा आहे. २०१९पर्यंत महापालिका क्षेत्रात एकही बेघर रहिवासी राहू नये, अशी आमची इच्छा आहे. यासंदर्भात प्रशांत ठाकूर यांच्या प्रस्तावाला नक्कीच मंजुरी देऊ व येथील बेघर रहिवाशांना घरे मिळवून देऊ. येथील लीज होल्डवरील जमिनी फ्री होल्ड करू याकरिता समितीचीदेखील स्थापना करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेतील घनकचरा, सांडपाण्याचे योग्य नियोजन करून प्रक्रिया केलेले सांडपाणी एमआयडीसीला देऊन त्यामधून पालिकेला उत्पन्न स्रोत मिळवून देऊ. नवी मुंबई विमानतळासाठी १५ वर्षांपासून रखडलेल्या विविध परवानग्या मोदी सरकारने केवळ २ वर्षांत पूर्ण केल्या. या ठिकाणी मे २०१८पर्यंत मेट्रो धावेल, तसेच एकूण १०६ कि.मी.चे मेट्रोचे जाळे पूर्ण करू, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राने भाजपाला कौल दिला आहे. पनवेलकरदेखील नक्कीच कौल देतील, असा विश्वासही या वेळी त्यांनी व्यक्त केला.उपस्थितांमध्ये खा. हरिवंश सिंह, रामशेठ ठाकूर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री जयकुमार रावल, आमदार प्रवीण दरेकर, आमदार नागो गाणार, जयदीप कवाडे, जगदीश गायकवाड, शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह खारघरमधील तीनही प्रभागांतील उमेदवार उपस्थित होते.