शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

राज्यभरातील २०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प

By admin | Updated: July 5, 2016 04:08 IST

राज्य शासनाच्या धोरणांच्या विरोधात ३०५ बाजार समित्या व ६०३ उपबाजारांमधील कामकाज सोमवारी बंद ठेवण्यात आले. व्यापारी व कामगारांच्या आंदोलनामुळे राज्यभर २०० कोटी रुपयांचे व्यवहार

- नामदेव मोरे,  नवी मुंबई

राज्य शासनाच्या धोरणांच्या विरोधात ३०५ बाजार समित्या व ६०३ उपबाजारांमधील कामकाज सोमवारी बंद ठेवण्यात आले. व्यापारी व कामगारांच्या आंदोलनामुळे राज्यभर २०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. बाजार समितीमधील व्यापाऱ्यांवर निर्बंध आणणे व बाहेरील व्यापार नियंत्रणमुक्त करणे याला विरोध दर्शविण्यात आला. गुजरातच्या धर्तीवर पूर्ण व्यापारच नियंत्रणमुक्त करण्याची मागणी व्यापारी आणि कामगारांनी केली आहे. शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळावा व ग्राहकांना स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने भाजीपाला व फळांवरील बाजारसमितीचे नियंत्रण उठवले आहे. शेतकऱ्यांचे हित होत असेल तर या निर्णयाला पाठिंबा आहे. परंतु बाजार समितीमधील व्यापारी व कामगारांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. माथाडी व व्यापारी प्रतिनिधींनी सांगितले की, राज्यातील ३०५ बाजारसमित्या व ६०३ उपबाजारांमध्ये वर्षाला ६२ हजार कोटींची उलाढाल होते. मुंबईमध्येच एक ते दीड हजार कोटींची उलाढाल होते. शासनाने २०१४ मध्ये साखर, डाळ, रवा, मैदा, सुका मेवा, तेल या वस्तू नियंत्रणमुक्त केल्या आहेत. त्याच धर्तीवर आता फळे व भाजीपाला नियंत्रणमुक्त करण्याचा निर्णय घेतला.निषेध सभा : वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांची निषेध सभा झाली. नाशिक, यवतमाळ, धुळे, जळगाव, सोलापूर आदी जिल्ह्यांमधील व्यापारी, कामगार त्यात सहभागी झाले. शासन शेतकऱ्यांच्या हिताचे नाव घेवून भांडवलदारांसाठी पायघड्या घालत आहे. त्यांचे शेतकरी प्रेम बेगडी आहे. आमचा त्यांच्या धोरणाला विरोध नाही. फक्त आमचे म्हणणे ऐकून घ्यावे व सर्वांसाठी समान नियम असावे, या मागणीसाठी राज्यव्यापी बंद करण्यात आला.- आ. शशिकांत शिंदे, माथाडी नेतेएपीएमसीतील व्यापाऱ्यांना नियंत्रण व बाहेर व्यापार करणाऱ्यांना स्वातंत्र्य ही दुहेरी नीती योग्य नाही. गुजरात सरकारने १६ एप्रिल २०१५ मध्ये अध्यादेश काढून भाजीपाला नियंत्रणमुक्त केला आहे. त्या धर्तीवर संपूर्ण नियंत्रणमुक्ती करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. - संजय पानसरे, व्यापारी प्रतिनिधी -मुंबई एपीएमसी