शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

टीडीसीसी बँकेला २० कोटींचा रोकड पुरवठा

By admin | Updated: June 6, 2017 04:08 IST

राष्ट्रीयीकृत, व्यापारी, सहकारी आणि नागरी आदी सुमारे एक हजार १२ बँकांना अत्यल्प रकमेच्या पुरवठ्यामुळे लाखो खातेदारांना त्याचा फटका बसला

सुरेश लोखंडे। लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, व्यापारी, सहकारी आणि नागरी आदी सुमारे एक हजार १२ बँकांना अत्यल्प रकमेच्या पुरवठ्यामुळे लाखो खातेदारांना त्याचा फटका बसला. याविषयी लोकमतने १० मे रोजी वृत्त प्रसिद्ध करून रोकड तुटवड्याची समस्या उघड केली होती. या वृत्ताची दखल घेऊन लिड बँकेने प्रयत्न करून ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेला १५ ते २० कोटी रुपयांचा रोज पुरवठा होत असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील ४५ एमटीएम आणि शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करणे सुलभ झाले आहे. या वृत्तास टीडीसीसी बँकेने दुजोरा दिला आहे.जिल्ह्यातील बँकांमध्ये सुमारे २०० ते २५० कोटींपेक्षा जास्त रकमेची उलाढाल होते. पण, रोकड तुटवड्यामुळे बँक ग्राहकांचे हाल झाले. जिल्ह्यातील एक हजार १५० एटीएम बंदावस्थेत होते. पण, त्यापैकी बहुतांश एटीएम आता सुरू आहेत. त्यामध्ये १०० कोटींपेक्षा जास्त रकमेचा भरणा रोज होत आहे. यानुसार, टीडीसीसी बँकदेखील त्यांचे ठाणे, पालघर जिल्ह्यातील ४५ एटीएम लवकरच सुरू करणार आहेत. प्रारंभी ग्राहकांचा लोड असलेले एटीएम सुरू करणार असल्याचे टीडीसीसीचे सीईओ भगीरथ भोईर यांनी लोकमतला सांगितले. टीडीसीसीच्या सुमारे १०१ शाखा आहेत. त्यांची रोज सुमारे २५ ते ५० कोटींची उलाढाल आहे. पण, केवळ दीड ते दोन कोटी रुपये दैनंदिन व्यवहारासाठी मिळत असत. पण, आता २० कोटी रुपयांचा पुरवठा होत असून त्यातून बँकेचे दैनंदिन व्यवहार सुरळीत झाल्याचा दावा भोईर यांनी केला. जिल्ह्यातील कृषी विकास सहकारी संस्थांच्या ७८ लाख ६२९ शेतकऱ्यांना ४११ कोटी १६ लाख रुपयांचे खरीप पीक कर्ज टीडीसीसीने मंजूर केलेले आहे. प्राप्त होणाऱ्या रकमेतून शेतकऱ्यांनादेखील पीककर्जाच्या रकमा दिल्या जात आहेत. यासाठी रिझर्व्ह बँकेकडून फारसे सहकार्य झाले नाही. मात्र, अन्य बँकांकडे गुंतवलेली रकम टीडीसीसी घेत असल्यामुळे बँकेतील गंगाजळी वाढली आहे. त्यातून दैनंदिन व्यवहार, पीककर्ज आणि अन्य व्यवहार सुरळीत केल्याचा दावा टीडीसीसीने केला आहे.