शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून १,६४२ कोटी रु पयांची भरपाई

By admin | Updated: March 8, 2017 00:25 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून खरीप हंगाम २०१६च्या सहभागी शेतकऱ्यांना १६४२ कोटी रु पयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. राज्यातील २४ लाख शेतकरी

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून खरीप हंगाम २०१६च्या सहभागी शेतकऱ्यांना १६४२ कोटी रु पयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. राज्यातील २४ लाख शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर समृद्ध शेतकरी उन्नत शेती अभियान गुढीपाडव्यापासून सुरु होणार आहे, असे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी उपस्थितीत केलेल्या चर्चेला उत्तर देताना ते म्हणाले की, मागील वर्षी सप्टेंबर - आॅक्टोबरमध्ये मराठवाड्यातील काही भागात अतिवृष्टी झाली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून लातूर विभागाला सर्वाधिक १३२८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. खरीप हंगाम २०१६मध्ये राज्यातील १,०९ कोटी शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला. त्यात ३७ लाख शेतकरी कर्जदार व ७२ लाख शेतकरी बिगर कर्जदार आहेत. नुकसान भरपाईस पात्र ठरलेल्या २४.०३ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित झाली आहे. तुर व कापूस पिकाची नुकसान भरपाई निश्चित होत आहे. विभागनिहाय मदत अशी : कोकण-६ लाख, नाशिक - ७ कोटी, पुणे - ९९ कोटी ३८ लाख, कोल्हापूर - ७३ लाख ८६ हजार, औरंगाबाद - १९१ कोटी ९२ लाख, लातूर-१३२८ कोटी, अमरावती - ४३ कोटी ३४ लाख, नागपूर - १ कोटी ६७ लाख. (विशेष प्रतिनिधी)जलसंधारण मंत्री राम शिंदे म्हणाले की, दुष्काळ आणि पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाण्याचे विकेंद्रीत साठे तयार करण्यासाठी जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. योजनेच्या माध्यमातून ११ हजार ४९४ गावांत काम सुरु असून काही ठिकाणी १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. लोकसहभागाच्या माध्यमातून ५०० कोटी रु पये निधी जमविण्याचा विक्र म झाला आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच गावांची निवड करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.सुक्ष्म सिंचनाला प्राधान्य- सुक्ष्म सिंचनाचे १५ एपिलपर्यंत थकबाकीदारांना अनुदान देण्यात येईल. - २०६५ स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचे कार्यारंभ आदेश - ९० लाख शेतकऱ्यांना माती परीक्षण कार्ड वाटपवर्षभरात ४०० प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यतावर्षानुवर्षे रखडलेले जलसिंचन प्रकल्प पूर्ण व्हावेत, यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन वर्षांत १४१ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. वर्षभरात ४०० प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. जलसिंचन प्रकल्पांसाठी भूसंपादनाच्या अडचणी येत असून सुमारे साडे आठ लाख हजार हेक्टर जमीन संपादनापोटी २ हजार आठशे कोटी रुपये देण्यात आले आहे. त्याचबरोबर दोन महिन्यांत भूसंपादनासाठीची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांना अदा करु न भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे.