शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘बॅँक आॅफ महाराष्ट्र’ला १३०० कोटींचा तोटा

By admin | Updated: May 5, 2017 03:58 IST

राज्यातील आघाडीची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक आॅफ महाराष्ट्रला २०१६-१७ या आर्थिक वर्षात १ हजार ३७३ कोटी रुपयांचा

पुणे : राज्यातील आघाडीची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक आॅफ महाराष्ट्रला २०१६-१७ या आर्थिक वर्षात १ हजार ३७३ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. तसेच बँकेच्या एकूण अनुत्पादित कर्जामध्ये (एनपीए) १७ हजार १८९ कोटी एवढी मोठी वाढ झाली असून, हे प्रमाण १६.९३ टक्के आहे. तर ३१ मार्च २०१७ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत बँकेला ४५५ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. मराठे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मराठे म्हणाले, बँकेला २०१५-१६ या आर्थिक वर्षात १०१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. मात्र, यंदा २०१६-१७ या आर्थिक वर्षात बँकेला १ हजार ३७३ कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे. बँकेच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा तोटा आहे. अनुत्पादित कर्जांत झालेली वाढ हे त्याचे मुख्य कारण आहे. बँकेच्या एकूण अनुत्पादित कर्जांची रक्कम १६.९३ टक्क्यांपर्यंत म्हणजेच १७ हजार १८९ कोटींपर्यंत वाढली आहे. आर्थिक वर्ष २०१५-१६ च्या अखेरीस ही रक्कम १० हजार ३८६ कोटी होती. बँकेने मार्च २०१७ अखेर अनुत्पादित कर्जांसाठी ३,८०० कोटींची तरतूद (प्रोव्हिजन) केली असून ही तरतूद मागील आर्थिक वषार्पेक्षा ८० टक्क्यांनी अधिक आहे. तर बँकेने २०१६-१७ या आर्थिक वर्षात ८१० कोटी रोख वसूल केल्याचेही मराठे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)