शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पीडित कुटुंबाला १ कोटीची भरपाई

By admin | Updated: June 11, 2017 01:30 IST

सुमारे ११ वर्षांपूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या सुदाम औटी या पुण्यातील व्यक्तीच्या कुटुंबाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे एक कोटी रुपयांहून अधिक भरपाई मिळणार आहे.

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सुमारे ११ वर्षांपूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या सुदाम औटी या पुण्यातील व्यक्तीच्या कुटुंबाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे एक कोटी रुपयांहून अधिक भरपाई मिळणार आहे.ज्या टेम्पोने समोरून धडक दिल्याने सुदाम यांचा २५ मे २००६ रोजी जागीच मृत्यू झाला त्या टेम्पोचा मालक आणि त्या वाहनाचा विमा उतरविलेली न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी यांनी मिळून औटी कुटुंबास ७८ लाख ११ हजार ५३३ रुपये भरपाईपोटी द्यावेत, असा आदेश न्या. एम. एस. सोनक यांनी दिला. या रकमेवर भरपाईचा दावा दाखल केला तेव्हापासूनचे सात टक्के दराने व्याजही मिळणार असल्याने एकूण भरपाई सव्वा कोटी रुपयांच्या घरात जाईल, असा अंदाज आहे.अपघात झाला तेव्हा सुदाम ४६ वर्षांचे होते व ते रिलायन्स इंडस्ट्रिजच्या पातळगंगा कारखान्यात मॅनेजर म्हणून नोकरीस होते. मारुती अल्टो मोटारीने काही जणांसोबत अहमदनगर-कल्याण रस्त्यावरून ओझरच्या दिशेने जात असता समोरून येणाऱ्या टेम्पोने अल्टोला जोरदार धडक दिल्याने सुदाम यांचा जागीच मृत्यू झाला होता. पत्नी, मुले व आईने केलेला भरपाईचा दावा मंजूर करून पुण्याच्या मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने एप्रिल २०११ मध्ये ७१ लाख ३६ हजार ९१७ रुपयांची भरपाई सात टक्के व्याजासह मंजूर केली होती. त्याविरुद्ध विमा कंपनी अपिलात आली होती.भरपाईची रक्कम निम्मी म्हणजे ३५ लाख रुपये करावी, अशी विमा कंपनीची मागणी होती. न्या. सोनक यांनी दोन्ही बाजूंचा विचार केला आणि अपघात होण्यात स्वत: सुदाम यांच्या निष्काळजीपणाचा काहीच भाग नव्हता या निष्कर्षावर शिक्कामोर्तब केले. सोबतच न्याायधिकरणाने केलेला हिशेब चुकला असल्याने न्या. सोनक यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेमधील विशेषाधिकाराचा वापर करून पुन्हा हिशेब केला आणि भरपाई वाढवून दिली आहे. त्यामुळे कंपनीला जास्त रक्कम द्यावी लागेल.- औटी कुटुंबाच्या वतीने असे दाखवून देण्यात आले की, सुदाम मोबाइलवर बोलत गाडी चालवीत होते याला कोणताही पुरावा नाही, कारण अपघातस्थळाच्या पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात मोबाइल मिळालेला नाही. मोबाइलबाबत कुणालाच माहिती नाही.