शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

राजघराण्यांनी घडविला नवा ‘इतिहास’!

By admin | Updated: April 9, 2015 01:27 IST

राजघराण्यांच्या इतिहासात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका करणाऱ्या राजघराण्याचा संघर्ष आता टोकाला पोहोचलाय

सचिन जवळकोटे, साताराराजघराण्यांच्या इतिहासात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका करणाऱ्या राजघराण्याचा संघर्ष आता टोकाला पोहोचलाय. कधी काळी मराठी साम्राज्याचा इतिहास घडविणारी ही दोन दिग्गज राजघराणी आज त्वेषानं एकमेकांवर तुटून पडताना पाहून अवघा महाराष्ट्र अचंबित झाला आहे. राजकीय इगोमुळं उडालेल्या या भडक्यामागचं खरं कारण मात्र निव्वळ साम्राज्यवाद हेच ठरलंय!दोघेही ‘राजे’ आहेत. एक खासदार तर दुसरे विधान परिषद सभापती. मात्र त्यांनी केलेला शब्दच्छल धक्कादायकच आहे. विशेष म्हणजे या वादात न पडता तटस्थपणे ‘चुप्पी’ साधणाऱ्या शरद पवारांची भूमिकाही आश्चर्यचकित करणारी. अजित पवारांनी मात्र ‘पोरकटपणा थांबवावा,’ असा पोक्तसल्ला दिल्यानंतर उदयनराजेंनी त्यांच्यावरही ‘शालजोडी’तून प्रहार केला. ‘सभापतींना पोरकटपणाची उपमा देऊन अजितदादांनी महाराष्ट्राचा अपमान केला’, असं ते म्हणाले. ‘नीरा नदीचं पाणी बारामतीला पळविलं,’ या कारणावरून दोन्ही राजेंमध्ये वादाला तोंड फुटलं असलं, तरी त्यामागे गेल्या पाच वर्षांमधील खदखद आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर सातारा जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्री मिळाला. पवार विरोधक असलेल्या विजय शिवतारेंनी डीपीसी बैठकीच्या व्यासपीठावर उदयनराजेंना आदरानं बसवलं. तेव्हाच ‘जमाना बदल गया है’ची चुणूक मिळाली. ‘अतिरिक्त पालकमंत्री’ असा टोमणा त्यांना रामराजेंनी हाणताच शीतयुद्ध भडकलं. त्यातच श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीत उदयनराजेंनी पारंपरिक विरोधकांना पाठबळ दिल्यानं रामराजे पुरते डिवचले गेले.