शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्साईट वाहतुकीत नियमांना हरताळ

By admin | Updated: April 29, 2016 03:49 IST

तालुक्यातील खाणीतून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बॉक्साईटचे उत्खनन होत आहे.

श्रीकांत शेलार,

श्रीवर्धन- तालुक्यातील खाणीतून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बॉक्साईटचे उत्खनन होत आहे. या प्रकारात उत्खननासाठी परवाना घेण्यापासून ते कारखान्यात पोचवण्यापर्यंत सर्वच पातळ्यांवर नियमांना हरताळ फासण्यात येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यात बॉक्साईट विपुल प्रमाणात आहे. शेखाडी, खुजारे, कुडगाव, कुरवडे-मारल तसेच सायगाव, मेघरे येथे प्रामुख्याने बॉक्साईटचे साठे आहेत. गेली बारा वर्षे येथे आशापुरा माईनसाठी अल्टगेज स्टोन क्र शर ही कंपनी खाणकाम करत आहे. साधारण २१०० एकरांतील खाणक्षेत्रात पाच कोटी टन साठा असल्याचा अंदाज आहे. वर्षाला एका खाणीतून एक ते तीन लाख टन उत्खनन होत असून कोट्यवधीची आर्थिक उलाढाल होते. मात्र हे उत्खनन होत असताना नियमांना हरताळ फासण्यात येत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. खाणीतून उत्खनन करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने नियम ठरवून दिले आहेत. परवानगी मिळेपर्यंत हे नियम कागदावर असतात. एकदा का परवाना मिळाला, की हवे तसे उत्खनन केले जाते. राज्यात सर्वच खाणींची ही अवस्था आहे. खाणीचे उत्खनन करताना किंवा त्यातून बॉक्साईट काढताना खनिकर्म विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार एक विशिष्ट चौकोनी खड्डा करून त्यातील उत्खनन आधी करावे, त्यानंतर तो खड्डा बुजवून अन्य चौकोनात बॉक्साईडचे उत्खनन होणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्ष खाणींची स्थिती पाहिली तर सर्रास उत्खनन करून मोठे खड्डे करून ते कधीही भरले जात नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय उत्खनन नेमके किती झाले, याची मोजदाद करणारी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने त्याचा फायदा खाणमालक घेत आहेत. खाणीतून बाहेर पडणारे बॉक्साईट तपासण्यासाठीची जबाबदारी जिल्हा पातळीवरील खनिकर्म विभागाची असते. परंतु या विभागाचे अधिकारी देखरेख करण्यासाठी फिरकतही नाहीत. बॉक्साईटची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर अचानक धाड पडल्यास खरी परिस्थिती उघड होऊ शकते. बॉक्साईटच्या बेसुमार वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा होत आहे. वृक्षांचीही हानी होत आहे. शिवाय अनेक ठिकाणी अपघात होऊन निरपराधांचे बळी जात आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील हरेश्वर ते आराठी तसेच आराठी ते दिघीपर्यंत या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. बॉक्साईटच्या खाणींवर स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांकडून केवळ कागदोपत्री लक्ष ठेवले जात आहे. मात्र प्रत्यक्षातील स्थिती भयानक असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. >खाणकामावर नियंत्रणच नाहीखाणीतील बॉक्साईटचे उत्खनन कोट्यवधींच्या घरातील आहे. विपुल नैसर्गिक संपदा असलेल्या या भागात बेछूटपणे आणि बेकायदा खाणकामाविरोधात पर्यावरणवादी संघटनांनी व परिसरातील जागरूक नागरिकांनी सातत्याने आवाज उठविला आहे. तथापि नियमबाह्य खाणकामास लगाम घालण्यात शासकीय यंत्रणेला अपयश येत आहे. कायद्याने घालून दिलेली बंधने पाळली तरच येथील नैसर्गिक अस्तित्व टिकेल, खाणींना परवाना देताना खाणकामाच्या जागेत वृक्षारोपण व त्यांचे संगोपनाचे बंधन घालणे गरजेचे असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.