पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या रिक्त जागांसाठी पाचव्या प्रवेश फेरीसह तीन विशेष फेऱ्या घेतल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना पाचव्या फेरीतील प्रवेशासाठी सोमवारपासून (दि. १ आॅगस्ट) महाविद्यालयांचे पसंतीक्रम आॅनलाइन पद्धतीने भरता येणार आहेत. विज्ञान, वाणिज्य व कला शाखेच्या २६ हजार ३४८ जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश गुण व पसंतीक्रमांच्या आधारे निश्चित केले जाणार आहेत. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे पाचव्या प्रवेश फेरीचे दोन भाग करण्यात आले आहेत. पाचव्या फेरीचे व दोन विशेष फेऱ्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
अकरावीसाठी उद्यापासून फेरी
By admin | Updated: July 31, 2016 00:55 IST