शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

घुमू लागले ढोल-ताशांचे आवाज

By admin | Updated: June 29, 2014 23:42 IST

लाडक्या गणपती बाप्पाला ढोल-ताशांचा नैवेद्य दाखविण्याकरिता तरुणाईची लगबग सुरू झाली आहे.

पुणो : लाडक्या गणपती बाप्पाला ढोल-ताशांचा नैवेद्य दाखविण्याकरिता तरुणाईची लगबग सुरू झाली आहे. नदीपात्रतील मंगल कार्यालये आणि मोकळ्या मैदानांतून ढोलांचा आवाज घुमू लागला आहे. पथकांच्या सराव समारंभांचे उद्घाटनही जल्लोषात होत आहे. परंतु पथकांनी किती वेळ सराव करावा, आवाजाची पातळी काय असावी, कुठे सराव करावा याबाबत पोलिसांकडून कोणतीही नियमावली घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे पथकांतील वादकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
गणोशोत्सवापूर्वी दोन महिने ढोल-ताशा पथकांचे सराव सुरू होतात. शिवगजर्ना, शिवमुद्रा, रूद्रगजर्ना, शिवप्रताप, महाशक्तीसारख्या अनेक पथकांचे सराव सुरू झाले आहेत. नदीपात्रतील मंगल कार्यालयांच्या जागेत आणि उपनगरांतील मैदानांवर वादक सराव करीत आहेत. पाऊस सुरू झाल्यावर पथकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पाऊस नसताना जास्तीत जास्त वेळ सराव करण्याचा प्रयत्न पथकप्रमुखांकडून केला जात आहे.
काही पथकांच्या सरावाला सुरुवात झाली असली, तरी बहुतांश पथकांतील वादकांचे फेसबुक, व्हॉट्सअॅपवरून एकत्रीकरण करणो सुरू आहे. 
यंदा कुठे सराव करायचा, किती वादकांना प्रवेश द्यायचा, नवे प्लॅन्स अशा अनेक विषयांवरील चर्चा रात्रीच्या वेळी पथकांच्या कट्टय़ावर रंगू लागल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील गणोशोत्सवाची चाहूल लागायला सुरुवात झाली असून, पथकांची लगबग सुरू झाली आहे.  (प्रतिनिधी)
 
4मंगल कार्यालयांचे लॉन्स अनेक कार्यक्रमांना भाडय़ाने देण्यात आलेले असतात. पुढील दोन महिन्यांत नाईलाजाने पथकांना सराव अनेकदा थांबवावा लागतो. त्यामुळे सुमारे 6क् दिवस आधी बहुतांश पथके सरावाला सुरुवात 
करतात. 
4मागील वर्षी पथकांच्या सरावाच्या वेळा, एका मंगल कार्यालयात किती पथकांनी सराव करावा, आवाजाची मर्यादा आणि ढोल-ताशांची संख्या याबाबत पोलीस व पथके यांमध्ये वाद झाले होते. त्यामुळे आत्तापासून पथकांची बैठक घेऊन पोलिसांनी नियमावली आखून दिल्यास पुढे होणारे वाद टाळता येऊ शकतील.
 
पथक बोलावण्याकरिता गणोशोत्सव मंडळांची लगबग
4पारंपरिक पद्धतीने गणोशोत्सव साजरा करण्याकरिता बहुतांश गणोशोत्सव मंडळे पुढाकार घेत आहेत. 
4स्पिकर्सच्या भिंतींपेक्षा ढोल-ताशा या पारंपरिक कलेला जास्त प्राधान्य मिळू लागले आहे. त्यामुळे आपल्या मंडळाच्या गणपतीसमोर विसजर्न मिरवणुकीत अमुक एका पथकाने वादन करावे, याकरिता मंडळातील कार्यकत्र्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.