शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

९७ वर्षांचे लालामास्तर करताहेत ९० वर्षांपासून रोजा

By admin | Updated: June 27, 2016 20:33 IST

मुस्लिम बांधवांचा सर्वात पवित्र महिना रमजान महिना म्हणजे रोजाचा महिना़ हिंदू बांधव ज्याप्रमाणे श्रावणच्या पवित्र महिन्यात व्रत, संकल्प, दान, धर्म, पोथी पुराण वाचन व तीर्थयात्रा

- सुरेश वाघमोडे

मंद्रुप, दि. २७ -  मुस्लिम बांधवांचा सर्वात पवित्र महिना रमजान महिना म्हणजे रोजाचा महिना़ हिंदू बांधव ज्याप्रमाणे श्रावणच्या पवित्र महिन्यात व्रत, संकल्प, दान, धर्म, पोथी पुराण वाचन व तीर्थयात्रा करतात, त्याचप्रमाणे मुस्लिम बांधव रोजा, नमाज पठण, खैरात, कुरआन पठण, जकात आदी गोष्टी करून अल्लाहला खुश ठेवून स्वत: आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करतात़ मंद्रुप (ता़ द़ सोलापूर) येथील ९७ वर्षांचे वृध्द संगीतमास्तर लालासाहेब अल्लीसाहेब शेख हे गेल्या ९० वर्षांपासून अखंडपणे सेवा करत आहेत़ महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात अनेक नाट्यकलावंत, संगीत शिक्षक तयार करण्याचा मान लालामास्तर यांना आहे़.

वयाची ९६ वर्षे पार करून ९७ व्या वर्षात पदार्पण केलेल्या लाला मास्तरांचा हात आजही थरथरतोय़ पण अद्याप त्यांची दृष्टी व कान मजबूत आहेत़ या वयात सुध्दा ते नियमितपणे वृत्तपत्राचे वाचन करतात़ शुक्रवारची विशेष नमाज अदा करतात़ कुरआनचे पठणही करतात़ वयाच्या ७ व्या वर्षापासून त्यांनी संगीतशास्त्राचा प्रसार व प्रचार केला आहे़. 
महाराष्ट्र शासनाकडून मिळणाºया वृध्द कलावंतांच्या मानधनावर ते सुध्दा गुजराण करत आहेत़ वृध्द कलावंतांच्या मानधनात वाढ करून, मानधन वेळेत मिळावे, अशी मागणी लालामास्तर यांनी केली आहे़ रोजाच्या महिन्यात ते पहाटे चार वाजता उठतात़ अर्धा ग्लास पाणी व एक केळी, अर्धा अंडा व चतकोर चपाती इतका आहार सहेरीसाठी घेतात़ इफ्तारसाठी फक्त २ खजूर, एखादे फळ व ग्लासभर पाणी पितात़ रात्री ९ वाजता हलका आहार घेऊन कुरआनचे वाचन करून समाधानाने झोपी जातात़. 
लालासाहेबांना संगीतनाट्य क्षेत्राचा ध्यास आहे़ एकदा तालीकोट येथील जोशी नाट्य कंपनीत संगीत विद्यादानाचे कार्य करताना रात्रभर नाटक करून पहाटे शिळीभाकरी खाऊन रोजा पकडला असल्याचे लालासाहेबांनी सांगितले़.
 
रोजा केल्याने वर्षभराची सकारात्मक ऊर्जा मिळते़ आनंद होतो़ सकारात्मक विचाराने जीवनात आनंद मिळतो़. 
- लालासाहेब अल्लीसाहेब शेख, 
मंद्रुप, ता़द़सोलापूर