शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘मेट्रो’बाबत सरकारची भूमिका आकसाची

By admin | Updated: January 23, 2015 00:16 IST

भाजपा सरकारची पुण्याबाबत आकसाची भावना दाखवित असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केली.

पुणे : नागपूर आणि पुणे मेट्रोचा प्रस्ताव एकाच दिवशी केंद्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन आघाडी सरकारच्या केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने या दोन्ही मेट्रोला मंजुरी दिली असताना, केवळ नागपूरचे नेते किती कार्यक्षम आहेत, हे दाखविण्यासाठी जाणूनबुजून केवळ नागपूर मेट्रोचेच उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे भाजपा सरकारची पुण्याबाबत आकसाची भावना दाखवित असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केली. चव्हाण म्हणाले की, राज्यातील लोकसंख्येनुसार, मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाणे असा मेट्रो प्रकल्पांचा क्रम ठरविण्यात आला होता. त्यानुसार पुणे मेट्रोच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर, नागपूर आणि पुणे मेट्रोचे प्रस्ताव ७ फेब्रुवारी २०१४ ला स्वतंत्र अधिकारी पाठवून केंद्राकडे पाठविण्यात आले. केंद्रीय नगरविकास विभागाने त्यास मान्यताही दिली. मात्र, त्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्यानंतर जाणूनबुजून निविदा प्रक्रिया राबविण्याच्या आधी नागपूर मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले आणि पुणे मेट्रो मागे पडली. प्रत्यक्षात दोन्ही मेट्रोचे एकाच वेळी उद्घाटन का झाले नाही, असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला. तसेच, नागपूर मेट्रोचे उद्घाटन करताना पुणे मुद्दाम मागे ठेवण्यात आले असून, नागपूरचे नेते हे कार्यक्षम असल्याचे दाखविण्यासाठी पुण्याबाबत आकसाची भावना ठेवली जात असल्याची टीका चव्हाण यांनी या वेळी केली. (प्रतिनिधी)‘एसपीव्ही’ची स्थापना का नाही ? ४‘एसपीव्ही’ची स्थापना न झाल्याने, ‘पुणे मेट्रो’ रखडली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आघाडी सरकारने ‘एसपीव्ही’ स्थापण्याची कार्यवाही पूर्ण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ती मागे पडली. मात्र, आता भाजपाने सत्तेत आल्यानंतर, नवा वाद काढून, ती स्थापण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हा प्रकल्प रखडला असल्याचेही ते म्हणाले.