शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

रोहितदादा प्रमाणेच मीही तुमचा नातू; उमेदवारीसाठी पवारांना आणखी एका नातवाचं साकडं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 16:11 IST

माजी आमदार दिवंगत नारायणराव पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात नारायणराव पवार यांचे नातू ऋषीकेश पवार यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणातच खेड मतदार संघातून उमेदवारीची मागणी केली. त्यामुळे खेडमधून ऋषिकेश पवार इच्छूक असल्याचे समोर आले.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून नेते पलायन करत आहेत. सत्ता येणार नाही, या भितीने आतापर्यंत २० हून अधिक नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. या सगळ्या घडामोडी सुरू असताना तरुण नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. आता ऋषीकेश पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेवारीसाठी जाहीर सभेतच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना साकडे घातले.

माजी आमदार नारायणराव पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात नारायणराव पवार यांचे नातू ऋषीकेश पवार यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणातच खेड मतदार संघातून उमेदवारीची मागणी केली. त्यामुळे खेडमधून ऋषिकेश पवार इच्छूक असल्याचे समोर आले.

रोहितदादा पवार यांना कर्जत-जामखेड मतदार संघातून उमेदवारी देण्यात येणार आहे. रोहित यांच्या प्रमाणेच मीही तुमचा नातूच आहे. मग मलाही खेड मतदार संघातून उमेदवारी द्यावी. मागील पाच वर्षांपासून मी मतदार संघात फिरत आहे. त्यामुळे मतदार संघाची चांगली माहिती झाली असून पक्षाने उद्याच्या विधानसभेत रोहितदादा यांच्यासोबत जाण्याची संधी द्यावी, असं ऋषीकेश पवार यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात म्हटले.

दरम्यान ऋषीकेश पवार यांनी भाषणात उमेदवारी मागणे शरद पवार यांना रुचले नाही. उमेदवारी ही खासगीत मागत असतात, भाषणात नव्हे, असं सांगताना ऋषीकेश यांना थोडं थांबण्याचा सल्ला पवारांनी दिला. अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्यानंतर पक्ष नव्याने उभा करण्यासाठी राष्ट्रवादीकडून आगामी विधानसभा निवडणुकीत तरुणांना संधी देण्यात येणार आहे. या संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे तरुणांच्या कोट्यातून ऋषीकेश पावर यांना संधी मिळणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.