शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रोबोटिक्स टेक्नॉलॉजी नवे अवकाश

By admin | Updated: February 15, 2016 04:07 IST

आॅटोमोबाइल्सप्रमाणे मोबाइल, टॅबलेट, संगणक आणि अन्य गॅजेटच्या जोडणीत छोट्या सामग्रींची जोडणी किचकट आणि अवघड मानली जाते

मुंबई : आॅटोमोबाइल्सप्रमाणे मोबाइल, टॅबलेट, संगणक आणि अन्य गॅजेटच्या जोडणीत छोट्या सामग्रींची जोडणी किचकट आणि अवघड मानली जाते. मात्र, देशात विकसित होत असलेल्या रोबोटिक्स् टेक्नॉलॉजीमुळे हे काम काही सेंकदांत पूर्ण होणे शक्य होणार आहे. मेक इन इंडिया सेंटरमधील दोन यूमी रोबो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. स्वित्झर्लंडच्या एबीबी कंपनीची भारतीय कंपनी असलेल्या एबीबी इंडियाने रोबोटिक तंत्रज्ञानावर भर दिला आहे. देशात मोबाइल वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे फॉक्सकॉन, ह्युवेई, सॅमसंग यांसारख्या बड्या मोबाइल उत्पादकांबरोबरच मायक्रोमॅक्स, इंटेक्स या कंपन्यांकडून उत्पादन वाढीवर भर दिला जाणार आहे. मनगटी घड्याळ, मोबाइल आणि टॅबलेटमधील सूक्ष्म स्पेअर्सपार्टची बांधणी यूमी रोबो काही सेकंदांत करतो. त्यामुळे वेळेची बचत होणार असून, उत्पादन वाढवण्यास मदत होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमधील नव्या मोबाइल उत्पादकांकडून रोबोट्ससाठी मागणी असल्याचे एबीबी इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. १९७४ पासून एबीबी रोबोटिक्स तंत्रज्ञान अस्तित्वात आहे. भारतीय कंपन्यांमध्ये या तंत्रज्ञानाबाबत जागृती वाढू लागली आहे. ‘मेक इन इंडिया’मध्ये नावीन्यतेला आणि तंत्रज्ञान वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या पाच वर्षांत भारतात रोबोटिक्स तंत्रज्ञानाला मोठी मागणी असणार आहे. सध्या रोबो तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन आघाडीवर आहे. एबीबी इंडियाकडून चीनमधून या रोबोंची आयात केली जाते. रोबो तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास होणे आवश्यक आहे. रोबो तंत्रज्ञान खर्चिक असल्याने, भारतीयांच्या गरजांप्रमाणे रोबो विकसित करत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)