शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत प्रथमच रोबोटिक मूत्रपिंड प्रत्यारोपण

By admin | Updated: July 6, 2017 04:55 IST

मुंबईत प्रथमच यशस्वीपणे रोबोटिक मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट) करण्यात आली आहे. सर एच.एन. रिलायन्स

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत प्रथमच यशस्वीपणे रोबोटिक मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट) करण्यात आली आहे. सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. अशा प्रकारची संपूर्ण राज्यातील ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा या हॉस्पिटलकडून करण्यात आला आहे. अंधेरी येथे राहणारे सी.एन. मुरलीधरन (५९) यांचे मूत्रपिंड निकामी झाले होते. गेल्या दीड वर्षांपासून ते डायलेसिसवर होते. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. उपचारासाठी त्यांना सर एच.एन. रिसायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले. निदानाअंती मुरलीधरन यांच्या पत्नीला मूत्रपिंड प्रत्यारोपण हा एकच पर्याय असल्याचे सांगण्यात आले. त्या वेळी पत्नी लीना (५५) हिने आपले एक मूत्रपिंड दान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार, तिची तपासणी करण्यात आली. त्यानंतर, मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले. हॉस्पिटल प्रशासनाच्या माहितीनुसार, ही शस्त्रक्रिया करताना आव्हाने होती. मात्र, सहकाऱ्यांच्या सहाय्याने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे. संसर्गाचा धोका कमीरुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. गुस्ताद डावर यांनी सांगितले की, रोबोटिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शस्त्रक्रियेत कमीत कमी रक्तस्त्राव झाला, तसेच प्रत्यारोपणानंतरचा संसर्गाचा धोका कमी झाला. जगातील खूप कमी सेंटरमध्ये या तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. रुग्णाची प्रकृती स्थिर : मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरल्यास, शस्त्रक्रियेनंतर संसर्ग होण्याचा धोका कमी असतो आणि प्रकृती लवकर स्थिर होण्यास मदत होते. पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया करण्यात आली, हा वेगळा अनुभव होता. मूत्रपिंड दाता आणि प्रत्यारोपित करण्यात आलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे, रुग्णालयाच्या युरॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. इंदरबीर गिल यांनी सांगितले, तसेच टीमवर्कमुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे स्पष्ट केले.