शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

टॅक्सीत लिफ्ट देण्याच्या नावाखाली लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2017 03:36 IST

रात्री-अपरात्री गरजू प्रवाशांना शेअरिंग टॅक्सीत लिफ्ट देण्याच्या नावाखाली लूट करणारी टोळी सक्रिय झाल्याचे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून उघड झाले.

मुंबई : रात्री-अपरात्री गरजू प्रवाशांना शेअरिंग टॅक्सीत लिफ्ट देण्याच्या नावाखाली लूट करणारी टोळी सक्रिय झाल्याचे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून उघड झाले. या टोळीतील पाच जणांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. नूर आलेम, दीपू मारवाडी, सलमान, मोहम्मद अमीर, छोटू अशी अटक आरोपींची नावे आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे रात्रीच्या वेळेस घरी जाण्यासाठी अनेक प्रवाशांना वाहन मिळण्यास अडचणी निर्माण होतात. अशा प्रवाशांना हेरून ही मंडळी त्यांना शेअरिंगवर घेऊन जाण्याचे आमिष दाखवितात. त्यानंतर भररस्त्यात त्यांना टॅक्सीतच मारहाण करत लूट करण्यात येते. त्यानंतर धमकावून प्रवाशांना खाली उतरवून ही मंडळी पळ काढतात. याबाबतच्या तक्रारी मुंबई पोलिसांना येत असल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. याबाबत नवी मुंबई पोलिसांतदेखील तक्रारी दाखल आहेत. गुन्हे शाखेच्या कक्ष ४ला यामागे मोठे रॅकेट असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने अधिक तपास सुरू केला. तपासात या टोळीतील काही जण हे वडाळा येथील राहणारे असल्याचे समजले. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून पाच जणांना अटक केली. तर या माथेफिरूंनी एका महिलेचे क्रेडिट कार्ड पळवून पैसे काढल्याचेही तपासाअंती उघडकीस आले आहे. (प्रतिनिधी)