शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक लुटणारी टोळी जेरबंद

By admin | Updated: June 13, 2016 23:14 IST

कर्जत : महामार्गावरील वाहने अडवून त्यांना लुटणारी टोळी कर्जत पोलिसांनी पाठलाग करून पकडली. चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.

कर्जत : महामार्गावरील वाहने अडवून त्यांना लुटणारी टोळी कर्जत पोलिसांनी पाठलाग करून पकडली. चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. यामुळे अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.नगर-सोलापूर महामार्गावर पाटेवाडी शिवारात रविवारी रात्री शिर्डीकडून बंगलोरकडे कांदा घेऊन जाणारा ट्रक (के. ए. ३९, ५७९८) हा ट्रक टोळीने अडवला. पारेवाडी शिवारात इलेक्ट्रीक बोर्डाजवळ चढ व वळण आहे. तेथे वाहनांचा वेग कमी होतो याचा फायदा घेऊन आरोपींनी ट्रक अडवला. ते ट्रकमध्ये चढले. चालक व क्लिनरला चाकूचा धाक दाखवला, त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडील रोख नऊ हजार रुपये काढून घेतले. घटना घडल्यानंतर ही माहिती कर्जतचे पोलीस निरीक्षक अजय चिंतले यांना समजली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह महामार्ग गाठला. तेथे पेट्रोलिंग करत असताना हॉटेल सावनजवळ त्यांना संशयित आरोपी दिसले. पोलीस पाहताच त्यांनी पळ काढला. यानंतर पोलीस टीमने त्यांचा पाठलाग केला. चार आरोपींना पकडले. यामध्ये सचिन विठ्ठल आडागळे (वय ३०), रवींद्र आत्माराम गायकवाड (वय १९), तात्या दगडू कटारे (वय ३८), संतोष दत्तात्रय होले (वय ३९), सर्व लोणी मसदपूर, ता. कर्जत येथील रहिवाशी आहेत. या घटनेप्रकरणी ट्रकचालक अमर निजामोद्दीन शेख, रा. सांगवी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद याने कर्जत पोलिसात फिर्याद दिली. आरोपीची ओळख पटली. आरोपी पकडणाऱ्या पोलीस पथकात पोलीस निरीक्षक अजय चिंतले, पो. हेड. कॉ. ए. एच. जाधव, बी. बी. दिवटे, ए. एन. गर्जे, डी. जी. इनगवले, चालक बी. आर. पवार यांचा समावेश होता. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एन. ससाणे हे पुढील तपास करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)