शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद

By admin | Updated: July 20, 2016 02:12 IST

प्रवाशांसोबत ओळख वाढवून त्यांना चहा अथवा सिगारेटमधून गुंगीचे औषध देत त्यांना लुटणाऱ्या एका टोळीला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली.

मुंबई : प्रवाशांसोबत ओळख वाढवून त्यांना चहा अथवा सिगारेटमधून गुंगीचे औषध देत त्यांना लुटणाऱ्या एका टोळीला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली. पकडण्यात आलेले सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी अशाच प्रकारे अनेक प्रवाशांना लुटल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. गुजरात येथे राहणारा नसीम खान (३०) हा प्रवासी रविवारी रात्री ट्रेनला उशीर असल्याने लोकमान्य टिळक टर्मिनस येथील आरक्षण कक्षात बसला होता. या दरम्यान टोळीतील आरोपी जियालाल भारतीय (४५), राजेश पाल (३०)आणि राजू भारतीय (३२) हे तिघे याठिकाणी आले. या आरोपींनी नसीम खानसोबत ओळख वाढवत त्याच्याशी मैत्री केली. काही वेळानंतर त्याला त्यांनी चहा आणि सिगारेट ओढण्यासाठी दिली. त्यात गुंगीचे औषध असल्याने काही वेळातच नसीमची शुद्ध हरपली. याचाच फायदा घेत आरोपींनी त्याच्याजवळ असलेली चार हजारांची रोख रक्कम लंपास करत पोबारा केला. नसीम बराच वेळ त्याठिकाणी असल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उठत नसल्याने पोलिसांनी तत्काळ त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यानंतर त्याने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार कुर्ला रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला.हे तिन्ही आरोपी पुन्हा लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात फिरत असल्याची माहिती कुर्ला रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत या आरोपींना अटक केली आहे. चौकशी दरम्यान अशाप्रकारे अनेक प्रवाशांना लुटल्याची कबुली या आरोपींना पोलिसांना दिली असून त्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)