शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करून युवकास लुटले

By admin | Updated: March 3, 2017 01:29 IST

सीसी कॅमेऱ्यात घटना कैद : आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला, दि.२ : बसस्थानकाजवळील रस्त्यावरून जाणाऱ्या युवकाला अडवून अनोळखी युवकाने त्याला मारहाण केली आणि त्याच्याकडील ४५0 रुपयांची रोख बळजबरीने हिसकावून घेतली. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी अनोळखी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी एका दुकानातील सीसी कॅमेऱ्याने टिपलेले चित्रण तपासले असता, अनोळखी युवक मारहाण करीत असल्याचे दिसून आले. त्याआधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. बाळापूर तालुक्यातील गोरेगाव बु. येथे राहणारा दीपक सुरेश आगरकर (२१) हा काही कामानिमित्त गुरुवारी दुपारी अकोल्यात आला होता. बसस्थानकावरून तो रुंगटा पेट्रोल पंप असलेल्या गल्लीतून जात असताना, सायंकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास अनोळखी युवकाने त्याला अडविले आणि पैशाची मागणी केली. दीपकने नकार दिल्यावर अनोळखी युवकाने त्याला मारहाण केली आणि त्याच्या खिशातील ४५0 रुपयांची रोख काढून घेतली. या दोघांमध्ये झालेली झटापट एका दुकानातील सीसी कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. दीपक आगरकर याने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन सीसी कॅमेऱ्यातील चित्रण तपासले. पोलिसांनी अनोळखी युवकाविरुद्ध भादंवि कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल केला.