शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांचे मूल्यांकन २५९ कोटींवर

By admin | Updated: August 20, 2015 23:24 IST

१२० कोटी खराब कामांचे वगळण्याची कृती समितीची मागणी

 कोल्हापूर : शहरात आयआरबी कंपनीने केलेल्या रस्त्यांचे मूल्यांकन करारावर आधारित निविदेतील दराप्रमाणे २५९ कोटी ७५ लाख इतके होत असले तरी खराब कामे आणि न केलेल्या कामांचे १२९ कोटी रुपये त्यातून वगळावेत, अशी मागणी गुरुवारी सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीच्या प्रतिनिधींनी राज्य सरकारकडे केली. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या मूल्यांकन समितीने प्रत्यक्ष झालेल्या कामाचे डीएसआर प्रमाणे २३९ कोटी ६२ लाख रुपयांचे मूल्यांकन केले होते. परंतु याला आयआरबीने हरकत घेऊन निविदेतील दराप्रमाणे झालेल्या रस्त्यांचे मूल्यांकन करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने कृती समिती व कोल्हापूर महानगरपालिका यांना आयआरबीच्या म्हणण्यानुसार मूल्यांकन करून अहवाल देण्यास सांगितले होते. त्यानुसार गेले दोन दिवस रात्रंदिवस तयार केलेला अहवाल गुरुवारी राज्य सरकारकडे सादर केला. ‘एमएसआरडीसी’च्या बांद्रा येथील कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहसचिव एस. जी. तामसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा अहवाल देण्यात आला. बैठकीस आमदार चंद्रदीप नरके, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य अभियंता ओहोळ, एन. आर. भांबुरे, कृती समितीचे सदस्य राजेंद्र भांबुरे, प्रसाद मुजुमदार, आदी उपस्थित होते. कृती समितीच्या सदस्यांनी नोबेल कंपनीच्या सर्वेक्षणावर आधारित करारातील रस्ते बांधणी खर्चावर येणारी रक्कम २५९ कोटी ७५ लक्ष रुपये होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वेगवेगळ्या बांधकाम साहित्याच्या थरांच्या कमी जाडीमुळे कमी होणारी किंमत, कराराप्रमाणे आवश्यक त्या ठिकाणी तांत्रिक स्पेशिफि केशनप्रमाणे न केलेल्या कामांची किंमत, जागेवर न दिलेल्या सुविधांची किंमत, आजपर्यंत देखभालीचा खर्च याची होणारी एकू ण किंमत १२० कोटी ३९ लाख होते. ही रक्कम एकूण खर्चातून वळती केल्यास केवळ १३९ कोटी ३५ कोटी रुपये होते. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना या गोष्टींचा विचार करावा लागेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. शिवाय आयआरबीला देण्यात आलेल्या भूखंडाची बाजारभावाप्रमाणे होणारी किंमत प्रकल्प खर्चात धरून मगच निश्चित रक्कम ठरविणे योग्य ठरेल, असेही अहवालात म्हटले आहे. रस्त्यांच्या कामाचे झालेल्या सर्वेक्षणातून आता दोन रकमा निश्चित झाल्या आहेत. डीएसआरप्रमाणे २३९ कोटी ६२ लाख रुपये, तर निविदेतील दराप्रमाणे २५९ कोटी ७५ लाख रुपये मूल्यांकन निश्चित झाले आहे. त्यातून आता मध्यम मार्ग काढण्यात येईल, असे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)