शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत समन्यायी पाणीवाटपासाठी २ महिन्यांत रोडमॅप - मुख्यमंत्री

By admin | Updated: April 13, 2016 01:56 IST

मुंबईमध्ये पाण्याच्या समन्यायी वाटपासाठी येत्या दोन महिन्यांत एक रोडमॅप तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महापालिकेला दिले. या समन्यायी

मुंबई : मुंबईमध्ये पाण्याच्या समन्यायी वाटपासाठी येत्या दोन महिन्यांत एक रोडमॅप तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महापालिकेला दिले. या समन्यायी वाटपासाठी मुंबईतील लोकप्रतिनिधी आणि जलतज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल, असे त्यांनी विधानसभेत जाहीर केले. मुंबईत दररोज प्रतिदिन ९०० एमएलडी पाण्याची गळती होत असल्याची कबुलीही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. मुंबईत पाणी मुबलक आहे, पण वितरण व्यवस्था सक्षम नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली. मुंबईतील विशेषत: पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पाणीटंचाईबाबत भाजपाचे सदस्य योगेश सागर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. शहरांतील विविध भागांना असमान पाणीवाटप अन्यायकारक असल्याचे सांगून, त्यांनी जुन्या जलवाहिन्यांमुळे किती प्रचंड पाणी वाया जाते, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर दररोज ९०० एमएलडी पाण्याची गळती होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. मुंबईत ८० ते १०० वर्षे जुन्या जलवाहिन्या आहेत. त्या गंजलेल्या आणि गळक्याही आहेत. त्यामुळे मुंबईत जो पाणीप्रश्न भेडसावत आहे, तो प्रामुख्याने पाणीवितरणातील उणिवांमुळे आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने जुन्या जलवाहिन्या बदलण्याचा एक प्रकल्प तयार केला असून, त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आशिष शेलार, मनिषा चौधरी, राम कदम, अतुल भातखळकर, सुनील प्रभू आदी सदस्यांनी या लक्षवेधीवर बोलताना, मुंबई उपनगरातील पाणीटंचाईच्या समस्या लक्षात आणून दिली. राम कदम यांनी घाटकोपर परिसरात रहिवाशांना दोन-दोन फूट खड्डा खणून त्यातून पाणी भरावे लागत असल्याचे सांगितले, तर मनिषा चौधरी यांनी गोरेगाव ते दहीसरमधील झोपडपट्टीवासियांना अत्यंत कमी पाणीपुरवठा होत असल्याचे सांगत, बऱ्याच भागांत पाणी गायब असल्याचे सांगितले. तसेच लोकप्रतिनिधींच्या सूचना महापालिकेने त्या रोडमॅपमध्ये लक्षात घेऊन उपाययोजना करावी, असे निर्देशही देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)