शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 02:55 IST

पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कामांच्या तुलनेत अत्यल्प निधी वितरीत झाल्याने राज्यातील रस्त्यांची कामे रखडली असल्याची कबुली ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी

मुंबई : पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कामांच्या तुलनेत अत्यल्प निधी वितरीत झाल्याने राज्यातील रस्त्यांची कामे रखडली असल्याची कबुली ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. विशेष म्हणजे, या योजनेसाठी सन २०१२-१३ आणि २०१३-१४ या दोन वर्षात केंद्राकडून राज्याला एक रुपयाचाही निधी मिळाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपा सदस्य अपूर्व हिरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री भुसे म्हणाले की, पंतप्रधान ग्रामसडक योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. या योजनेतून केंद्राने चालू वर्षासाठी राज्याला ६०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मंजूर निधीपैकी आतापर्यंत केवळ ११६ कोटी रुपये राज्याला मिळाले आहेत. या योजनेसाठी राज्य सरकारचा हिस्सा ४०४ कोटी रुपयांचा असून राज्यानेही अवघे ७७ कोटी रुपये वितरीत केले आहेत. तर, गेल्यावर्षी या योजनेसाठी केंद्राने राज्याला ५५३ कोटी रुपये दिले होते. दुसरीकडे राज्य सरकारने स्वत:च्या हिश्शांचे १७६ कोटी रुपये गेल्यावर्षी वितरीत केले आहेत. या योजनेसाठी सन २०१२-१३ आणि २०१३-१४ या दोन वर्षात केंद्र सरकारकडून निधीच मिळाला नाही. परिणामी निधीअभावी या योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या ग्रामीण रस्त्यांची कामे पूर्णत: ठप्प झाली आहेत. जी गत केंद्राच्या निधीची तीच अवस्था राज्याच्या निधी वाटपाची सुद्धा आहे. पैसे मिळत नसल्याने ठेकेदारांनी कामे अर्धवट सोडून दिली आहेत, असे भुसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे यांनी माणगाव लोणशी ते उणेगाव रस्त्याच्या कामाची गेली तीन वर्षे चौकशीच झाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. रस्ता बांधल्यानंतर पुढील पाच वर्षे रस्त्याची देखभाल करणे ठेकेदारावर बंधनकारक असताना सुद्धा या रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष होत आहे, असे ते म्हणाले. त्यावर एका महिन्यात कामाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन भुसे यांनी यावेळी दिले.