शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार

By admin | Updated: June 9, 2016 02:24 IST

आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या हद्दीतील रस्ते दुरूस्तीचे आणि खड्डे बुजवण्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले

मुंबई: आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या हद्दीतील रस्ते दुरूस्तीचे आणि खड्डे बुजवण्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, असा दावा मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात बुधवारी केला.बुधवारच्या सुनावणीत महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी महापालिकेच्या हद्दीतील रस्ते दुरुस्तीचे व खड्डे बुजवण्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पावसाआधी पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन खंडपीठाला दिले. ‘रस्ते दुरुस्त करणे आणि खड्डे बुजवण्याचे काम पावसाळ्यातही सुरू असते. काम पूर्ण झाल्यानंतरही पावसाळ्यात रस्त्यांच्या देखभालीसाठी महापालिका पाहणी करणार आहे,’ असेही अ‍ॅड. साखरे यांनी सांगितले.खड्डे पडल्याची व रस्ते खराब असल्याची तक्रार नागरिकांना करता यावी, यासाठी महापालिकेने हेल्पलाईन नंबर आणि मोबाईल अ‍ॅप सुरू केले असल्याचेही अ‍ॅड. साखरे यांनी खंडपीठाला सांगितले.हेल्पलाईन नंबरची आणि मोबाईल अ‍ॅपला वर्तमानपत्रांद्वारे प्रसिद्ध द्यावी, अशी सूचना खंडपीठाने महापालिकेला केली. ‘जाहिराती ठळक आणि मोठ्या असू द्या. जेणेकरून लोकांना त्या सहजच दिसतील. जर राजकारण्यांच्या आणि महापालिकेच्या जाहिराती वर्तमानपत्राचे पूर्ण पान भरून येऊ शकतात तर या जाहिराती पूर्ण पान भरून का दिल्या जाऊ शकत नाही,’ अशी कोपरखळीही खंडपीठाने महापालिकेला मारली.महापालिकेले आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावा, असे म्हणत खंडपीठाने पुढील सुनावणी १५ जून रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी) पत्राचे याचिकेत रूपांतरशहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे अपघातही वाढले आहेत, अशा आशयाचे पत्र उच्च न्यायालयाचे विद्यमान न्या. गौतम पटेल यांनी उच्च न्यायालयाला लिहीले होते. उच्च न्यायालयाने या पत्राचे जनहित याचिकेत रुपांतर केले.