शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रुंदीकरण वादग्रस्त

By admin | Updated: June 10, 2016 03:34 IST

फेरीवाल्यांना संरक्षण देणारी मीरा-भार्इंदर मनपा नियम धाब्यावर बसवून रस्ता रुंदीकरण करत असल्याचा आरोप आहे.

भार्इंदर : रस्ते, पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांना संरक्षण देणारी मीरा-भार्इंदर मनपा नियम धाब्यावर बसवून रस्ता रुंदीकरण करत असल्याचा आरोप आहे. त्यातच आता रुंदीकरणातील घोटाळे समोर येत आहेत. रुंदीकरणादरम्यान मुन्शी कम्पाउंडमध्ये काहींची दुकाने, घरे वाचावीत, यासाठी पालिकेच्या सीमारेषेप्रमाणे ती तोडलेली नाही. कारवाईपूर्वी पालिकेने बांधकाम कुठपर्यंत तोडायचे, याची सीमारेषा आखली होती. परंतु, महापालिका अधिकारी व कंत्राटदाराने येथील शादाब हॉटेलपासून पुढे सीमारेषेनुसार बांधकामे तोडलेलीच नाही. एवढेच नव्हे तर नाला बांधण्यास घेतला असून तोही सीमारेषेच्या बाहेर नागमोडी वळणे घेत बनवला आहे. कार्यकारी अभियंता शिवाजी बारकुंड यांनी घटनास्थळी सर्व वस्तुस्थिती पाहूनही कारवाई केली नाही. काहींची दुकाने व घरे वाचवण्यासाठी ही ‘अर्थपूर्ण’ तडजोड झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. वादग्रस्त आमदारासह स्थानिक नगरसेविका व पालिका अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याशिवाय रुंदीकरण घोटाळा शक्य नसल्याचा आरोप येथील कारवाईने बाधित अन्वर अली मन्सुरी यांनी केला आहे. यामुळे महापालिकेची ही संपूर्ण कारवाई आता संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. (वार्ताहर)>विचारणा करणाऱ्याला‘गुन्हा दाखल करू’ची धमकीपालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल वानखेडे यांना सीमारेषेपर्यंत बांधकाम का तोडले नाही, अशी विचारणा घटनास्थळी रहिवाशांनी व मी केली असता उलट पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी वानखेडेने दिल्याचे सय्यद अलीखान यांनी सांगितले. पालिकेकडून मनमानीमी येथे १९८० पासून राहत आहे. पालिकेने आमच्याकडील पुरावे न पाहताच बांधकाम तोडले. नुकसानभरपाई, मोबदला तर काहीच मिळाला नाही. उलट, पालिकेने अर्धे घर, दुकान तोडल्याने त्याच्या बांधकामासाठीच दीड ते दोन लाखांचा भुर्दंड आम्हाला सहन करावा लागला. कामाच्या पाहणीसाठी जाणार : खांबितआयुक्त अच्युत हांगे व शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. तर, कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्याशी संपर्क साधला असता आपण प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यासाठी जाणार आहे, असे ते म्हणाले.