शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

विरारमधील रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2016 02:45 IST

विरार पूर्वेकडील मुख्य रस्ता मलनिस्सारण प्रकल्पाच कामासाठी पुन्हा खोदून कोट्यवधी रुपयांचा चुराडा केल्याची बाब उजेडात आली

विरार :कोट्यवधी रुपये खर्चून वर्षभरापूर्वी पेव्हर ब्लॉक बसवण्यात आलेला विरार पूर्वेकडील मुख्य रस्ता मलनिस्सारण प्रकल्पाच कामासाठी पुन्हा खोदून कोट्यवधी रुपयांचा चुराडा केल्याची बाब उजेडात आली आहे. पावसाच्या पहिल्याच तडाख्यात हा रस्ता खचून त्यात एक ट्रक अडकून पडला होता. वसई विरार पालिकेने गेल्यावर्षी गावडवाडी ते मनवेलपाडा रोड पर्यंत सुमारे एक-दीड किलोमीटर लांबीच्या या मुख्य रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्चून पेव्हर ब्लॉक बसविले होते. पूर्वेकडील हा मुख्य रस्ता असून पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी तीन महिने वाहतूकीचा मार्गही बदलण्यात आला होता. पेव्हर व्लॉक बसवल्यानंतर विरारकरांचे समाधान झाले होते. तर ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम करून तांत्रिकदृष्टया अनेक चुका केल्याचा आरोपही जाणकारांनी केला होता. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे सहा महिन्यांनी या रस्त्याच्या मध्यभागी मलनिस्सारण प्रकल्पासाठी गटार खोदून पाईप टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ सुरु झाला असून काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे.रस्ता खणून ठेवल्याने वाहतुकीचाही खोळंबा होऊ लागला आहे. शनिवारी दुपारी रेल्वे सब-वे समोर रस्ता खचल्याने त्यात एक ट्रक अडकून पडला होता. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, रविवारी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने नालासोपारा शहरातील जनजीवन सुरळीत सुुरु झाले. त्यामुळे नागरिकांनी एकदाचा सुटकेचा निश्वास सोडला.(प्रतिनिधी)>जनजीवन सुरूकाल रात्री शहरात साचलेल्या पाण्याचा निचरा होऊन रस्त्यांवरून वाहतूक सुरळीतपणे सुुरु झाली. काल संध्याकाळी पापडी नजिक मुख्य रस्त्यावर मोठे झाड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. हे झाड ट्रान्सफार्मरवर पडल्याने या भागातील वीज पुरवठा काही काळ खंडीत झाला होता.