शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रोड रोमिओला 'ती'ने शिकवला धडा!

By admin | Updated: August 9, 2016 23:45 IST

मुलीने चौकीनजीक उभ्या राहिलेल्या पोलिसांना या प्रकाराची माहिती देऊन पोलिसांसमोरच त्या मुलाच्या श्रीमुखात भडकावली

लोकमत आॅनलाईनकऱ्हाड (सातारा), दि. 9 - फ्रेंडशीप करण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने मुलीचा पाठलाग सुरू केला. संबंधित मुलीने नकार देऊनही त्याचा पाठलाग सुरूच होता. अखेर मुलीने चौकीनजीक उभ्या राहिलेल्या पोलिसांना या प्रकाराची माहिती देऊन पोलिसांसमोरच त्या मुलाच्या श्रीमुखात भडकावली. शहरातील चावडी चौकात मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शहरानजीकच्या एका गावातील मुलगी मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे बसस्थानकात आली. तेथून ती चालत महाविद्यालयाकडे जात होती. त्यावेळी एका मुलाने तिचा पाठलाग सुरू केला. रस्त्यात काही अंतर गेल्यानंतर त्याने त्या मुलीला अडवले. त्याने तिला फ्रेंडशीप करणार का, असे विचारले. मात्र, त्याला नकार देऊन मुलगी पुढे गेली. मात्र, तरीही त्या मुलाने तिचा पाठलाग सुरूच ठेवला. मुलगा पाठीमागून येत असल्याने मुलगी घाबरली. ती लवकरात लवकर कॉलेजमध्ये पोहोचण्याच्या मन:स्थितीत होती. मात्र, मुलगा तिचा पिच्छा सोडत नव्हता. त्यामुळे घाबरलेली मुलगी अक्षरश: घामाने भिजली. त्यावेळी चावडी चौकात काही पोलिस कर्मचारी उभे असल्याचे मुलीला दिसले. धाडस करून ती त्याठिकाणी गेली. अचानक एक कॉलेजमधील मुलगी घाबरलेल्या स्थितीत समोर उभी राहिल्याचे पाहून ती संकटात असावी, हे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी तिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी तिने रडतच एक मुलगा माझा पाठलाग करून त्रास देत आहे, असे सांगितले. पोलिसांनी मुलाबाबत विचारणा केली असता मुलीने संबंधित मुलाकडे बोट दाखवले. पोलिसांनीही तातडीने संबंधित मुलाला ताब्यात घेतले. मुलीसमोर आणून त्याच्याकडे त्यांनी चौकशी सुरू केली. मात्र, त्याचवेळी संतापलेल्या मुलीने संबंधित मुलाच्या श्रीमुखात लगावली.घटना समोर येताच त्याठिकाणी गर्दी जमली. नागरिकांनी संबंधित मुलावर संताप व्यक्त केला. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी संबंधित मुलगी व मुलाला शहर पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्या पालकांना बोलावून घेण्यात आले. संबंधित मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला समज देऊन नातेवाइकांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)