शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते सुरक्षा समितीची १० वर्षांत बैठकच नाही

By admin | Updated: January 13, 2015 04:52 IST

राज्यात रस्ते अपघातांतील मृत्यूंची समस्या गंभीर असताना मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्या ‘रस्ते सुरक्षा उच्चस्तरीय समिती’ची एकही बैठक गेल्या १० वर्षांत झालेली नाही

अलिबाग : राज्यात रस्ते अपघातांतील मृत्यूंची समस्या गंभीर असताना मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्या ‘रस्ते सुरक्षा उच्चस्तरीय समिती’ची एकही बैठक गेल्या १० वर्षांत झालेली नाही, अशी टीका परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी तत्कालीन आघाडी सरकारवर केली. २६ व्या रस्ते सुरक्षा अभियानाचा आरंभ सोमवारी अलिबागमध्ये रावते यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात परिवहन क्षेत्रात केवळ ५० टक्के मनुष्यबळ कार्यरत आहे. त्यामुळे लवकरच नवीन भरती करून परिवहनला नवसंजीवनी देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. रावते म्हणाले, रस्ते अपघातात दरवर्षी देशात सहा लाख आणि राज्यात ६ हजारांहून अधिक प्रवासी मृत्युमुखी पडतात. याची गंभीर दखल संयुक्त राष्ट्र संघाने घेतली आहे. राज्य सरकारनेही ११ ते २५ जानेवारी दरम्यान रस्ते सुरक्षा अभियान हाती घेतल्याचे रावते यांनी सांगितले. ६० हजार कोटी रुपयांची रस्त्यांची कामे केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. गोवा राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सहा वर्षांत पूर्ण होईल, असे रावते यांनी स्पष्ट केले. राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचार परिवहन खात्यात होत असून यावर कारवाई करण्याची मागणी आमदार पंडित पाटील यांनी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलिबागचे आमदार पंडित पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून उरणचे आमदार मनोहर भोईर, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, जि.प. बांधकाम सभापती चित्रा पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)