शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रेवदंडा येथील रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: July 4, 2016 03:25 IST

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

बोर्ली-मांडला /मुरुड : अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या खराब रस्त्यांवरून गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत असून खड्ड्यांचे सोयरसुतक हे बांधकाम विभागाला नाही. रेवदंडा येथील मोठे बंदर ते गोळा बस स्थानक आणि पारनाका ते हायस्कूलदरम्यान मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची नावापुरतीच डागडुजी करण्यात आली मात्र पहिल्याच पावसात रस्त्याची फार दैना उडाली आहे. रेवदंडा मोठे बंदर ते गोळा स्थानक या दरम्यान रेवदंडा पुलाजवळ तसेच आगरकोट किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यापासून ते गोळा स्थानक आणि पारनाका ते हायस्कूल या दरम्यान मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यातून वाहन चालवीत असताना खड्ड्यातील पाणी हे बाजूने जरा पादचारी अथवा वाहनचालकाच्या अंगावर उडत असते, त्यामुळे अनेकवेळा भांडणेही होतात. रेवदंडा बंदर येथे पडलेल्या खड्ड्यानजीक तसेच हायस्कूलजवळ पसरलेल्या खड्ड्यानजीक उपाहारगृहे आहे. त्या उपाहारगृहामध्ये ग्रामस्थ पदार्थ खाण्यासाठी जात असतात. पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात पाणी साचल्याने या ठिकाणी डासांची तसेच चिलटांची पैदास होऊन साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे पडलेल्या मोठ्या खड्ड्यातून तीनचाकी वाहन एका बाजूला पलटी होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही असे वाहनचालक प्रशांत भोईर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. रेवदंडा गोळा स्थानक ते केळकर स्थानक दरम्यानच्या रस्त्याचे सिमेंट काँक्र ीटीकरण करण्याचे काम पावसाळा सुरु होण्यापूर्वी होणे गरजेचे होते मात्र त्या रस्त्याचे काम अद्यापपर्यंत सुरू नसल्याने प्रवासी आणि विद्यार्थी यांना राज्यपरिवहन महामंडळाची बस पकडण्यासाठी जवळपास एक किलोमीटर अंतरावर म्हणजे रेवदंडा चौल बाह्यवळणावर यावे लागत आहे. या रस्त्याचे काम सुरू केले असल्याने रेवदंडा गावात फक्त विक्र म, मिनीडोर, छोटी चारचाकी आणि दुचाकी वाहने ये -जाकरीत आहेत. ही वाहने गोळा स्थानक -कालभैरव मंदिर मार्गे पारनाका अशी वळविण्यात आली आहेत. (वार्ताहर)>रेवदंडा येथील रस्त्यासाठी अंदाजपत्रक बनविण्याचे काम सुरु रेवदंडा येथे पहिल्याच पावसात खड्डे पडले असून त्याची दुरु स्ती करण्यासाठी अंदाजपत्रक बनविण्याचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण करण्यात येऊन तो वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल. त्यांच्याकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर काम लवकरच पूर्ण करण्यात येईल.- रोहित कुडतरकर, कनिष्ठ बांधकाम उप विभाग, अलिबाग